
भारतीय क्रिकेटर्स आणि चित्रपट अभिनेत्रींच नाव नेहमी जोडलं जातं. यात अनुष्का-विराट, गीता-हरभजन, युवराज-हेजलसह अनेक नावं आहेत. असेही अनेक क्रिकेटर्स आहेत, ज्याचं फिल्म स्टार्ससोबत नाव जोडलं गेलं. नात्याची चर्चा झाली. पण ब्रेकअप झालं. आम्ही कपिल देवबद्दल बोलतोय. एका अभिनेत्रीसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. पण दोघांच लग्न झालं नाही.

कपिल देव यांनी क्रिकेटच्या मैदानात चाहत्यांना अनेक संस्मरणीय क्षण दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 साली पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुद्धा खूप चर्चा झाली. लग्नाआधी कपिल देवची ओळख सारिकासोबत झालेली. (क्रेडिट: Manoj Verma/HT via Getty Images)

रिपोर्ट्स नुसार, मनोज कुमार यांच्या पत्नीमुळे कपिल देव आणि सारिकाची भेट झाली. दोघे त्यावेळी सिंगल होते. दोघे परस्परांच्या जवळ आले. सारिका आणि कपिल देव दोघे परस्परांना पसंत करायचे. पण काही काळाने कपिल देव यांनी हे नातं तोडून रोमी भाटियाकडे जाण्याचा निर्णय घेतला. रोमी भाटिया त्यावेळी कपिल देव यांची गर्लफ्रेंड होती. आज पत्नी आहे.

रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी रोमी आणि कपिलच्या नात्यात सर्वकाही आलबेल नव्हतं. त्यावेळी कपिल देव सारिकाच्या जवळ गेले. त्यानंतर पुन्हा रोमीजवळ गेले. दोघांनी लग्न केलं. सारिकाने सुद्धा नंतर साऊथ सुपरस्टार कमल हासन सोबत लग्न केलं. 2004 साली दोघांचा घटस्फोट झाला.

सारिका कमल हासन यांच्या प्रेमात पडली. त्यावेळी कमल हासन आधीपासूनच विवाहित होते. चित्रपटात काम करताना त्या कमल हासन यांना भेटलेल्या. दोघांनी वेगळं होण्याचा प्रयत्न केला. पण असं झालं नाही. घटस्फोटानंतर ,सारिका जीवनात आली. कमल आणि सारिका यांना दोन मुली आहेत. श्रुती आणि अक्षरा.