
सोनाक्षी सिन्हाने करवा चौथच्या दिवशी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पती झहीर इकबालसोबत अनेक फोटो शेअर केले. या व्हायरल फोटोमध्ये दोघे अबू धाबीच्या शेख जायग ग्रँड मशिदीत दिसले.

फोटोत सोनाक्षी सिन्हा सलवार सूटमध्ये दिसतेय. तिच्या डोक्यावर ओढणी होती. तिचा हा लूक खूप व्हायरल होतोय. तिच्यासोबत झहीर इकबाल सुद्धा आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाक्षी शेख जायद ग्रँड मशिदीच सौंदर्य न्याहाळताना दिसते. तिने सोबत एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय.

व्हिडिओत दिसत की सोनाक्षी पती झहीर सोबत मशिदीच्या आतमध्ये फेरफटका मारत आहे. दोघांना एकत्र पाहून फॅन्सनी कमेंटमध्ये प्रेम व्यक्त केलय.

या पोस्टसोबत सोनाक्षीने एक कॅप्शन सुद्धा लिहिलय. 'अबू धाबीमध्ये एक छोटंस समाधान मिळालं' सोनाक्षीच्या या पोस्टवर एका युजरने प्रश्न उपस्थित केलाय.

एका यूजरने लिहिलय बूट घालून मशिदीत जाणं गुन्हा आहे. त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिलय. "बूट घालून आम्ही आत गेलो नाही, नीट बघं. मशिदीच्या बाहेर आहोत आम्ही. आत जाण्याआधी बूट बाहेर काढले. एवढं तर आम्हाला येतं"