काव्या मारन की गौतम अदानी? भारतात सर्वाधिक खासगी विमाने कोणत्या उद्योगपतीकडे?
भारतातील प्रसिद्ध उद्योगपत्यांचे खासगी आयुष्य हे कायमच चर्चेत असते. त्यांच्याकडे कोणत्या लग्झरी गाड्या आहेत? कुठे आलिशान घरे आहेत? अशा अनेक गोष्टी सर्वांना जाणून घ्यायच्या असतात. चला जाणून घेऊया भारतात सर्वाधिक खासगी विमाने कोणत्या उद्योगपत्याकडे आहेत.

आपल्या देशात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांची संपत्ती कोट्यवधी रुपये आहे. हे उद्योगपती अनेकदा त्यांच्या लग्झरी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सर्वसामान्यांसाठी लग्झरी कार हे प्रतिष्ठीत असलेल्याचे लक्षण मानले जाते. तर बड्या उद्योगपतींसाठी खासगी विमान हे स्टेटस सिम्बॉल मानले जाते. चला जाणून घेऊया की भारतातील कोणत्या उद्योगपतीकडे सर्वाधिक खासगी विमाने आहेत.
या यादीत पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आहेत. त्यांच्याकडे 10 पेक्षा जास्त बिझनेस एअरक्राफ्ट आणि खासगी विमाने आहेत. या विमानांची किंमत 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत. त्यांच्याकडे दोन खासगी विमाने असल्याचे बोलले जाते. यामधील एक लांबचा पल्ला गाठण्यासाठी आहे.
या यादीमध्ये पूनावाला कुटुंबातील सायरल पूनावाला आणि अदर पूनावाला यांचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे दोन खासगी विमाने आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली काव्या मारनचे वडील कलानिधी मारन देखील आहेत. त्यांच्याकडे एक विमान असल्याचे बोलले जात आहे.