तब्बल 150 वर्षांनी सापडलं गूढ जहाज, खोल पाण्यात रहस्यमयी…नव्या शोधाने सगळे थक्क!

शोध लावलेल्या जहाजाचे थ्रीडी मॉडेल अद्याप तयार नव्हते. आता हे मॉडेल तयार झाले असून या शोधाची घोषणा करण्यात आली आहे. लॅक ला बेले हे जहाज 1864 मध्ये ओहायो येथील क्लिवलँड येथे तयार झाले होते.

| Updated on: Feb 17, 2026 | 12:00 AM
1 / 5
साधारण दीडशे वर्षांपासून भयानक वादळात लॅक ला बेले (Lac La Belle) नावाचे जहाज वादळात गायब झाले होते. मिशिगन येथील सरोवरात हे जहाज कुठेतरी नाहीसे झाले होते. या जहाजाचा गेल्या साठ वर्षांपासून शोध सुरू होता. आता याच आलिशान जहजाचा शोध लागला आहे.

साधारण दीडशे वर्षांपासून भयानक वादळात लॅक ला बेले (Lac La Belle) नावाचे जहाज वादळात गायब झाले होते. मिशिगन येथील सरोवरात हे जहाज कुठेतरी नाहीसे झाले होते. या जहाजाचा गेल्या साठ वर्षांपासून शोध सुरू होता. आता याच आलिशान जहजाचा शोध लागला आहे.

2 / 5

CBS न्यूजच्या वृत्तानुसार ‘शिपव्रेक वर्ल्ड’ या टीमने लॅक ला बेले जाहजाचा शोध लावला आहे. ऑक्टोबर 2022 मध्येच या जाहाजाचा शोध लागला होता. सरोवराच्या साधारण 20 मीटर खोल पाण्यात हे जहाज सापडले. आता या शोधाची घोषणा करण्यात आली आहे.

3 / 5

शोध लावलेल्या जहाजाचे थ्रीडी मॉडेल अद्याप तयार नव्हते. आता हे मॉडेल तयार झाले असून या शोधाची घोषणा करण्यात आली आहे. लॅक ला बेले हे जहाज 1864 मध्ये ओहायो येथील क्लिवलँड येथे तयार झाले होते. 217 फूट लांब हे जहाज होते.

4 / 5

त्या काळात हे सर्वाधिक प्रसिद्ध असे हजाज होते. 13 ऑक्टोबर 1872 रोजी हे जहाज 53 प्रवाशी आणि क्रू मेंबर्ससह मिलवॉकी येथे रवाना झाले होते. या जहाजात डुकराचे मांस, पीठ, व्हिस्की असे खाद्यपदार्थही होते. प्रवास सुरू झाल्यानंतर या जहाजात अचानकपणे पाणी भरू लागले.

5 / 5

संकटाची चाहूल लागताच जहाजाच्या कॅप्टनने जहाज परत आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. परंतु तोपर्यंत हवामान खूपच बिघडले होते. त्यानंतर पाण्याच्या उंच लाटांमध्ये हे जहाज बुडून गेले. या दुर्घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला होता. उर्वरित प्रवासी लाईफबोटमधून सुररुप बचावले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us