Lalbaughcha Raja : लालबाग राजाच्या चरणी चक्क 1 किलो सोन्याची वीट, चांदीची गदा, लिलावासाठी चकित करणाऱ्या वस्तू!
लालबागच्या राजाच्या दानपेटीत रोख रकमेसोबत सोन्या-चांदीच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत. यंदाच्या उत्सवात सोन्याचे दागिने, चांदीचे मोदक आणि इतर आकर्षक वस्तू भक्तांनी अर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक जगभरातून येत असतात. त्यामुळे दरवर्षी लालबागच्या राजाला भरगोस दान मिळते.
या नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाकडे दरवर्षी लाखो लोक नवस करतात. राजाने त्यांच्या इच्छा पू्र्ण केल्यावर भक्त त्याची परतफेड करायला चुकतही नाही.
यावर्षी सुद्धा अनेक भक्तांचे नवस राजाने पूर्ण केल्याने भक्तांनी सोने - चांदीच्या वस्तू तसेत अनेक गोष्टी भेट म्हणून दिल्या आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात लालबागचा राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा लिलाव आज सुरू आहे.
लालबागच्या राजाला यंदा एका अज्ञात भाविकांने एक किलो २४ कॅरेटचे सोन्याची वीट अर्पण केली आहे. या सोन्याची वीट ची किंमत १ कोटी ४८ लाख रुपये आहे.
तर एका अज्ञात भाविकाने १८ कॅरेट सोन्याची १४१ ग्रॅम वजनाची गणेश मूर्ती अर्पण केली आहे. या गणेश मूर्ती ची किंमत १५ लाख ६५ हजार रूपये आहे.
तसेच अनेक सोन्याचे दागिने, मोदक, चांदीच्या गदा, क्रिकेटच्या बॅट, आणि दोन मोटर बाईक लिलावाचे मुख्य आकर्षण आहेत…
लिलावातून मिळालेल्या नीधीचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध समाजोपयोगी उपक्रमामध्ये वापरतात. यामध्ये सर्वाधिक निधी वैद्यकीय उपचारांसाठी मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.