AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचा भारताला मोठा झटका, ज्याची भीती तेच घडले, जाणूनबुजून बांगलादेशाने..

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यातच भारताला पुन्हा एकदा मोठा धक्का बांगलादेशने दिला. ढाकाने उच्चायुक्त असद आलम सियाम यांचा दाैरा पुढे ढकलला आहे. बांगलादेशचे पंतप्रधान इतर देशांचे दाैरे करत आहेत, पण भारत दाैऱ्यावर येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.

बांगलादेशचा भारताला मोठा झटका, ज्याची भीती तेच घडले, जाणूनबुजून बांगलादेशाने..
India and Bangladesh
| Updated on: Nov 16, 2026 | 2:20 PM
Share

भारताच्या शेजारी देश बांगलादेशच्या नाटकात वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशाचा नाटकीपणा बघायला मिळतोय. पाकिस्तानच्या नादी लागून आपल्याच पायावर बांगलादेश दगड मारून घेत आहे. बांगलादेशने नुकताच भारताला मोठा धक्का दिला. भारताला ज्याचा भीती होती, तोच निर्णय बांगलादेशने घेतला, ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावात येऊ शकतात. बांगलादेशचे नवीन उच्चायुक्त असद आलम सियाम दिल्ली दाैऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा दिल्ली दाैरा पुन्हा एकदा लांबणीवर पडला. गंगा जलवाटप करार लवकर करण्यासाठी बांगलादेश आग्रही आहे. या करारावरच दोन्ही देशाचे संबंध टिकले आहेत. शेख हसीना यांना भारताने राहण्यासाठी आश्रय दिल्याने बांगलादेश आणि भारतातील संबंध तणावात आली. भारतावर अनेकदा टीका करताना बांगलादेश दिसत आहे.

दोन्ही देशांमधील गंगा जलवाटप कराराच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ढाकाने उच्चायुक्त असद आलम सियाम यांचा दाैरा पुढे ढकलला आहे. बांगलादेशच्या या निर्णयाने दोन्ही देशातील व्दिपक्षीय संबंधावर भारताला चिंता सतावत आहे. इकॉनमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सियामच्या 8 नोव्हेंबरच्या विदेश दाैऱ्यानंतर आता तो दाैरा अचानक रद्द करण्यात आला.

या महिन्याच्या शेवटपर्यंत ते भारत दाैऱ्यावर येऊ शकतात. मात्र, याबाबत अजून काही माहिती पुढे येऊ शकली नाही. यापूर्वीही बांगलादेशच्या पंतप्रधानांनी निमंत्रण असूनही भारत दाैरा टाळला होता. तारिक रहमान यांनी बांगलादेशाचे सूत्र आपल्या हातात घेतल्यापासून ते भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. तारीक रहमान यांनी जपान, चीन, तुर्की आणि मलेशियाचा दाैरा केला.

पण भारत हा शेजारी देश असूनही भारत दाैऱ्यावर येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, तारीक रहमान भारत दाैऱ्यावर येतील. पण बांगलादेशने यावर काहीच भाष्य केले नाही. बांगलादेश भारतावर नाराज आहे. कारण भारताने शेख हसीना यांना शरण दिले. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिल्यापासून दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. त्यात गंगा जल कराराचा मुद्दा दोन्ही देशात आहे.

Follow Us
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!