AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Bandh : मोठी बातमी! आता भारत बंदची घोषणा, प्लॅनही ठरला; सगळे ओबीसी….नेमकी मागणी काय?

जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली. याच मागमीला घेऊन येत्या 2 नोव्हेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

Bharat Bandh : मोठी बातमी! आता भारत बंदची घोषणा, प्लॅनही ठरला; सगळे ओबीसी....नेमकी मागणी काय?
bharat band by obcImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 7:13 PM
Share

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : सध्या राज्यात तसेच देशातही आंदोलनाचे लोन पसरलेले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी विरोधक करत आहेत. सीजेपीने याच मागणीला घेऊन दिल्लीत आंदोलन उभारले आहे. तर दुसरीकडे मुंबईतही वातावरण तापले असून माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यांनी आता महाराष्ट्र बंद करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. एकीकडे हे आंदोलन पेटलेले असताना आता दुसरीकडे ओबीसींनी आपला लढा तीव्र केला आहे. ओबीसींनी आता भारत बंदची हाक दिली आहे.

2 नोव्हेंबर रोजी भारत बंदची हाक

मिळालेल्या माहितीनुसार जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली. याच मागमीला घेऊन येत्या 2 नोव्हेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली

जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने अचूक आकडेवारी मिळणार नाही, असा दावा करत देशभरातील ओबीसी संघटनांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. या बंदसाठी ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ या बॅनरखाली देशव्यापी आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली आहे. तशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

अगोदर आंदोलन, निवेदनं नंतर….

या बंदबाबत निर्णय घेण्यासाठी नागपुरात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान खासदार आणि आमदारांना निवेदने देणे, तसेच त्यांच्याकडे ओबीसींचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबरला देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात येणार येतील. तसेच 25 ऑक्टोबरला जिल्हास्तरावर मोर्चे काढले जातील.

त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी भारत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 15 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती आणि जनगणना आयोगाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त निवेदन देण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यांतील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली राष्ट्रीय समन्वय समितीही स्थापन करण्यात येणार आहे. ओबीसींची अचूक जनगणना व्हावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ