कोरोनामुळे घराच्याबाहेर पडता येत नाही कंटाळा आलाय?, या सोप्या टीप्स फॉलो करा; घरातही राहाल आनंदी

जगासह देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या संकटामुळे तुम्ही कुठेही पर्यटनासाठी जाऊ शकत नाहीत. लॉकडाऊमध्ये सुटी तर असते मात्र सुटी असूनही तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थिमध्ये काय करावे? ज्यामुळे तुमचा मूड आनंदी राहील आणि तुम्ही घरात बसूनही सुटीचा आनंद घेऊ शकाल, याबाबत आम्ही आज तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत.

1/5
सोबत चित्रपट पहा : असे अनेक चित्रपट असतात की जे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बसून बघू शकता. रोज असा एक तरी चित्रपट पाहिल्यास तुमचा वेळ कसा गेला हे तुम्हाला कळणारही नाही. आणि सर्वांनी एकत्र मिळून चित्रपट पहाने हा तुमच्यासाठी एक नवा अनुभव ठरू शकतो.

2/5
पुस्तक वाचा:  अनेक लोकांना पुस्तक वाचायला आवडते, दिवसभराच्या ताण तणावातून मनाला शांत करण्यासाठी अनेकजण पुस्तक वाचतात. तुम्ही चहा किंवा कॉफी पिता-पिता देखील पुस्तके वाचू शकता. यामुळे तुम्हाला आनंद तर मिळेलच सोबत तुमचा मुड आनंदी राहण्यासाठी मदत होईल.

3/5
योगासने करा : योगाला निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानले जाते. तुम्ही जेव्हा घरी असता, तेव्हा दररोज नित्यनियमाने न चुकता रोज सकाळी योगासने करा. योगासनामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल.

4/5
इनडोअर पिकनिक : लॉकडाऊनमुळे तुम्हाला सुटी आहे, मात्र घराबाहेर पडता येत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या घरातच असलेल्या गार्डनमध्ये आपल्या कुटुंबासोबत इनडोअर पिकनिकचा आनंद घेऊ शकता. त्यांच्यासोबत यादरम्यान तुम्ही मनसोक्त गप्पा मारू शकता.

5/5
वेगवेगळे पदार्थ तयार करा: जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही वेगवेगळ पादर्थ तयार करून, तुमच्या कुटुंबासोबत त्याचा अस्वाद घेऊ शकता. वेगवेगळे पदार्थ तयार करण्यामध्ये देखील तुमचा बराचवेळ जाऊ शकतो. त्यामुळे दिवसभर काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI