
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायेदशीर आहे. कोरफड आणि कोथिंबीरचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे, या फेसपॅकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात हिरव्या कोथिंबीरीची पेस्ट घ्या आणि त्यात दोन चमचे कोरफडीचे जेल मिसळा आणि चेहऱ्याला लावा. याच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात.

एका भांड्यात कोथिंबीरीची पेस्ट घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

उन्हाळ्यातही तुमची त्वचा कोरडी होत असेल तर कोथिंबीरमध्ये मध मिसळून लावा. मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला आतून मुलायम बनवण्याचे काम करतात. मध आणि कोथिंबीरचा फेसपॅक त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.

अनेक आरोग्य फायद्यांनी समृद्ध दही त्वचेच्या काळजीसाठी देखील प्रभावी मानले जाते. कोथिंबीर घेऊन ती बारीक करून त्यात दोन चमचे दही मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी होऊ द्या. त्यानंतर पाण्याने आपला चेहरा धुवा.

जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळची समस्या असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि लिंबू फेसपॅक चेहऱ्याला लावून ही समस्या दूर करू शकता. यासाठी कोथिंबिरीच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावा. काही वेळाने साध्या पाण्याने काढून टाका. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)