
काही खास तेल डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. बरेच लोक डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी वेदनानाशक आैषधे घेतात. मात्र, ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. जर आपल्याला डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असेल तर आपण काही तेल डोक्याला लावली पाहिजेत.

निलगिरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे एक अँटीसेप्टिक म्हणूनही काम करते. डोकेदुखी आणि संक्रमण टाळण्यासाठी, स्नायू दुखणे कमी करण्यासाठी आपण या तेलाचा उपयोग करू शकतो.

लैव्हेंडर तेलाचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आपण या तेलाने डोक्याची मालिश करा, यामुळे तुम्हाला आराम वाटेल.

पुदिन्याचे तेल देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डोकेदुखीच्या उपचारांसाठी हे सर्वात लोकप्रिय तेलांपैकी एक आहे. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)