
माधुरी दीक्षित बॉलिवूडमधलं ते नाव आहे, जे कधीच विसरता येणार नाही. 80 आणि 90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर माधुरी दीक्षितचा जलवा होता. एकापेक्षा एक सरस चित्रपटाद्वारे माधुरीने प्रेक्षकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवलं.

माधुरीने आपल्या अभिनयाने फक्त प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर आपला डान्स आणि सौंदर्याची सुद्धा मोहिनी घातली. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, माधुरीला कधी हिरॉइन बनायचं नव्हतं.

माधुरी दीक्षितने इयत्ता 12 वी ची परिक्षा दिल्यानंतर चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी तिचं वय 18-19 वर्षांच होतं. तिचा पहिला चित्रपट 'अबोध' 1984 साली रिलीज झाला. पण तिला चित्रपटात करिअर करायचं नव्हतं. माधुरीला दुसऱ्या क्षेत्रात करिअर घडवायचं होतं.

माधुरी दीक्षितला डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची होती. तिने चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी डॉक्टर बनण्याच स्वप्न पाहिलेलं. पण नशिबाला काही दुसरचं मंजूर होतं. शिकत असतानाच तिला राजश्री प्रोडक्शनने तिला आपल्या ‘अबोध’ चित्रपटाची ऑफर दिली. माधुरीने ही ऑफर स्वीकारली.

माधुरीच्या कुटुंबालाही तिने अभिनेत्री व्हावं अशी इच्छा नव्हती. असं म्हणतात की, राजश्री प्रोडक्शनच्या लोकांनी तिच्या पालकांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यांना समजावलं. त्यानंतर माधुरीला चित्रपटात काम करायची परवानगी मिळाली.