AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSL 2026: हैदराबादच्या कर्णधारपदी मार्नस लाबुशेन, आश्चर्यकारक निर्णयाची रंगली चर्चा

ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याची लॉटरी लागली आहे. हैदराबाद किंग्समॅन संघाच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती झाली आहे. हा संघ पहिल्यांदाच पीएसएल स्पर्धेत खेळण्याची उतरणार आहे. त्यामुळे मार्नस लाबुशेनच्या नावाची घोषणा होताच क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे.

PSL 2026: हैदराबादच्या कर्णधारपदी मार्नस लाबुशेन, आश्चर्यकारक निर्णयाची रंगली चर्चा
PSL 2026: हैदराबादच्या कर्णधारपदी मार्नस लाबुशेन, आश्चर्यकारक निर्णयाची रंगली चर्चा Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Mar 17, 2026 | 5:52 PM
Share

पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन पहिल्यांदाच खेळणार आहे. असं असताना पहिल्याच पर्वात त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा टाकली आहे. हैदराबाद किंग्समॅन संघाने त्याला कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. त्याच्या नावाची घोषणा केल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण मार्नस लाबुशेनकडे टी20 क्रिकेट खेळण्याचा इतका अनुभव नाही. फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये फक्त बिग बॅश लीग स्पर्धेत खेळला आहे. इतकंच काय तर इंग्लंडच्या टी20 ब्लास्ट स्पर्धेत भाग घेतला होता. मार्नस लाबुशेन हा कसोटी आणि वनडे क्रिकेटमधील एक चांगला खेळाडू आहे. पण टी20 क्रिकेटमध्ये त्याचं कुठेच नाव नाही. त्याने क्रिकेट कारकि‍र्दीत फक्त 55 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 26.5 च्या सरासरीने 1381 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 126.5 चा आहे. यात त्याने 8 अर्धशतकं ठोकली आहे. पण आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटचा अनुभव काहीच नाही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये फक्त एकच सामना खेळला आहे.

हैदराबाद किंग्समॅन संघात टी20 क्रिकेटमधील अनुभवी आणि दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. असं असूनही मार्नस लाबुशेनवर विश्वास टाकला आहे. कदाचित मॅक्सवेल या स्पर्धेत सर्व सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असावा. मार्नस लाबुशेनने संपूर्ण स्पर्धेत खेळण्याची ग्वाही दिली आहे. मार्नस लाबुशेनने कसोटी क्रिकेटमध्ये 63 सामने खेळले असून 4694 धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी 44 पेक्षा जास्त आहे. तर 11 शतकं ठोकली आहेत. तर वनडे 1871 धावा केल्या असून 2 शतकं आणि 12 अर्धशतकं ठोकली आहेत. लाबुशेनने एक आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला असून त्यात फक्त 2 धावा केल्या आहेत.

हैदराबाद किंग्समॅनचा संघ : मार्नस लाबुशेन (कर्णधार), सैम अय्यूब, आकिफ जावेद, माज सदाकत, ग्लेन मॅक्सवेल, उस्मान खान, मोहम्मद अली, कुसल परेरा, मुहम्मद इरफान खान, हसन खान, शयान जहांगीर, बार्टमॅन, हम्माद आजम, राइली मॅरिडिथ, शरजील खान, आसिफ महमूद, हुनैन शाह, रिजवान महमूद, साद अली आणि तैय्यब आरिफ.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल