AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबई इंडियन्स सर्वात शक्तिशाली संघ, पण सहाव्यांदा जेतेपद मिळवणार का? फक्त एवढंच टेन्शन

IPL 2026, MI Squad Analysis: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उरणार आहे. मागच्या दोन पर्वात त्याच्या नेतृत्वात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली. यंदा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करणार का? यासाठी टीम मॅनेजमेंटला सुरूवातीला मोठे निर्णय घेणं भाग आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स सर्वात शक्तिशाली संघ, पण सहाव्यांदा जेतेपद मिळवणार का? फक्त एवढंच टेन्शन
मुंबई इंडियन्स सर्वात शक्तिशाली संघ, पण सहाव्यांदा जेतेपद मिळवणार का? फक्त एवढंच टेन्शनImage Credit source: PTI
| Updated on: Mar 17, 2026 | 5:28 PM
Share

IPL 2026, MI Squad Analysis: आयपीएल 2026 स्पर्धेत जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स संघ सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी हवी तशी झाली नाही. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही पदरी निराशा पडला पडली. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर मागच्या पाच वर्षांपासून जेतेपदाचा दुष्काळ आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ टॉप 4 मध्ये होता. पण एलिमिनेटर फेरीतच आशा संपुष्टात आल्या. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघ सज्ज झाला आहे. 2026 आयपीएल जेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्ससाठी कायम वरदान ठरलं आहे. पण टीम व्यवस्थापनापुढे एक टेन्शन आहे.

मुंबई इंडियन्सची जमेची बाजू

मुंबई इंडियन्सचे आघाडीच्या फलंदाजांना पर्यायच नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या या सारखे तगडे फलंदाज आहे. हे खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. तसेच दक्षिण अफ्रिकेचा फॉर्मात असलेला विकेटकीपर फलंदाज क्विंटन डीकॉकही संघात आहे. तसेच रियान रिकल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स फॉर्मात असलेल्या खेळाडूंमुळे प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा काही प्रश्नच येत नाही. मुंबई इंडियन्सचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात आणि धावांचा पाठलाग करण्यात कमी पडतील असं वाटत नाही.

गोलंदाजीत तर मुंबई इंडियन्सकडे हुकूमाचा एक्का आहे. जसप्रीत बुमराह असल्याने चार षटकांचा खेळ मुंबईच्या हातात आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकुर, ट्रेंट बोल्ट आणि दीपर चहर हे देखील गोलंदाजीत साथ देणार आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीत योगदान देणार हे काय नव्याने सांगायला नको. इतकंच काय तर फिरकीतही मुंबईचा संघ तगडा दिसत आहे. अल्लाह गझनफर आणि मिचेल सँटनरसारखे स्टार फिरकीपटू आहेत. पर्याय म्हणून मयंक मार्केंडेय आणि रघु शर्मा आहेत.

संघ व्यवस्थापनापुढे टेन्शन

मुंबई इंडियन्स सर्वच बाबतीत तगडी दिसत आहे. पण असं असताना प्लेइंग 11 निवडणं आव्हानात्मक असणार आहे. कारण प्लेइंग 11 मध्ये 4 विदेशी खेळाडू असणार आहे. आयपीएल नियमानुसार, जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडूंची निवड प्लेइंग 11 मध्ये करता येईल. मुंबईकडे शेरफेन रूदरफोर्ड, गजनफर, कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, रियान रिकल्टन, ट्रेंड बोल्ड, विल जॅक्स आणि क्विंटन डिकॉक आहे. यापैकी कोणत्या चार खेळाडूंची निवड करायची असा प्रश्न असणार आहे. शेरफेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, रियान रिकलटन, विल जॅक्स आणि क्विंटन डी कॉक हे फॉर्मात आहेत. यापैकी कशी निवड करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल