Rain Update : पुढचे दोन दिवस महत्त्वाचे! या जिल्ह्यांत पावसाची शक्यता, IMD चा नवा अंदाज समोर!

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे. सांगली जिल्ह्यात 18 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

| Updated on: Oct 17, 2026 | 9:44 PM
1 / 5
सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. सरकारने बहुसंख्य जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केलाय. शेतकऱ्यांच्या हातातून खरिपाचा हंगाम गेलाय. दरम्यान, आता रबी हंगामात पाऊस यावा, अशी आशा बाळगली जात आहे.

सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. सरकारने बहुसंख्य जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केलाय. शेतकऱ्यांच्या हातातून खरिपाचा हंगाम गेलाय. दरम्यान, आता रबी हंगामात पाऊस यावा, अशी आशा बाळगली जात आहे.

2 / 5

असे असतानाच सांगली, सातारा, धुळे, कोल्हापुरात सरी बरसल्या आहेत. आता पुढचे दोन दिवस महत्त्वाचे असणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट, वादळी वारे वाऱ्यांसह पाऊस होऊ शकतो.

3 / 5

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे. सांगली जिल्ह्यात 18 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

4 / 5

सातारा, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांतही ढगांचा गडगडाट होऊ शकतो. तसेच वादळी वारे वाहू शकतात. सोलापूर, धाराशीव, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांत वादळी वारे वाहू शकतात. तसेच ढगांचा गडगडाट होऊ शकतो.

5 / 5

महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही. सध्या धुळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातही काही ठिकाणी सरी बरसल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us