‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ईशा डेचं धूमधडाक्यात लग्न; कोण आहे नवरा?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा डे हिनं नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिषेक खणकरशी तिने लग्न केलं असून या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Mar 12, 2026 | 11:27 AM
1 / 5
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे ईशा डे. कार्यक्रमातील स्किट्समध्ये वेगवेगळ्या रुपात येऊन ईशा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते. याच ईशाने आता तिच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे.

2 / 5

ईशा डे हिनं गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याला हास्यजत्रेतील कलाकारसुद्धा उपस्थित होते. लग्नात ईशाने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर अभिषेकनं मेहंदी रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं.

3 / 5

'नवराई माझी लाडाची' असं कॅप्शन देत वनिता खरातने या लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. ईशाचा नवरा अभिषेक हा गीतकार आणि लेखक आहे. त्याने 'लक्ष्मी निवास' आणि 'खुलता कळी खुलेना' या मालिकांची शीर्षक गीते लिहिली आहेत.

4 / 5

अभिषेक खणकरनं मालिकांसोबत चित्रपटांमधीलही काही गाणी लिहिली आहेत. तर ईशाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तिने 'गुलकंद' या चित्रपटातही काम केलंय.

5 / 5

एकांकिका, नृत्य, व्यावसायिक नाटक, मालिका, वेब सीरिज अशा विविध माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ईशाने लंडनमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us