AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरूममध्ये ठेवलेला साबण लवकर विरघळतो? 2 हेअर बँडची ही छोटीशी ट्रिक वाचवेल तुमचे पैसे !

बाथरूममध्ये ठेवलेला साबण वापरण्यापेक्षा पाणी आणि ओलाव्याच्या संपर्कात आल्यामुळे जास्त विरघळतो का? महागडी सोप डिश विकत घेण्याऐवजी केवळ दोन साधे हेअर बँड किंवा किचन स्पंजच्या मदतीने साबण लवकर सुकवून तो दुप्पट काळ कसा टिकवता येईल? जाणून घ्या ही सोपी आणि प्रभावी युक्ती!

| Updated on: Oct 22, 2026 | 4:26 PM
Share
तुम्ही आणलेला नवा साबणही बाथरूममध्ये ठेवल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत विरघळाला लागतो का? मग या सोप्या ट्रिक्स नक्की वापरून पाहा. ही पद्धत अतिशय सोपी आणि तितकीच उपयुक्त आहे. सोप डिश (Soap Dish) आणि साध्या हेअर बँडच्या मदतीने तुम्ही साबण अधिक काळ टिकवू शकता.

1 / 6
बाथरूममध्ये ठेवलेला साबण वापरल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मऊ होऊन विरघळू लागला, तर वारंवार नवा साबण विकत घ्यायचा तरी किती वेळा? अनेकदा साबण लवकर संपण्यामागे त्याचा जास्त वापर हे कारण नसून तो ठेवण्याची चुकीची पद्धत कारणीभूत असते. पाणी आणि ओलाव्याच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे साबण लवकर मऊ होऊन विरघळू लागतो. परिणामी पैशांचा अपव्यय होतो आणि बाथरूममधील शेल्फ किंवा बेसिनही अस्वच्छ होते.   तुम्हीही दर महिन्याला वारंवार साबण विकत घेत असाल आणि साबणदाणी स्वच्छ करण्याच्या कटकटीला कंटाळला असाल, तर आता महागडी ड्रेनेज असलेली साबणदाणी विकत घेण्याची गरज नाही. तुमच्या ड्रेसिंग टेबलवर असलेले दोन साधे हेअर बँड किंवा रबर बँड तुमची ही समस्या काही मिनिटांत सोडवू शकतात.

2 / 6
साबण लवकर विरघळण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या खालच्या बाजूला साचणारं पाणी. अंघोळ केल्यानंतर किंवा हात धुतल्यानंतर आपण साबण थेट साबणदाणीत ठेवतो. त्यावेळी साबणावरून टपकणारं पाणी साबणदाणीच्या तळाशी साचतं. साबण सतत या पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळे तो हळूहळू विरघळू लागतो. खालच्या बाजूने हवा खेळती न राहिल्याने साबण लवकर सुकत नाही आणि तो चिकट पेस्टसारखा होतो.

3 / 6
इतकंच नाही, तर साबणाच्या खालच्या बाजूने हवाही खेळती राहील. त्यामुळे वापरानंतर साबण लवकर सुकण्यास मदत होईल. साबण सतत ओला राहणार नसल्यामुळे तो लवकर विरघळण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं आणि अधिक काळ टिकू शकतो.

4 / 6
तुमच्याकडे हेअर बँड उपलब्ध नसतील, तर स्वयंपाकघरात भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पंजचीही मदत घेता येईल. ही पद्धत साबण कोरडा ठेवण्यास आणि तो लवकर विरघळण्याचं प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. सर्वप्रथम नवीन किंवा स्वच्छ केलेला जुना स्पंज घ्या. स्पंज आकाराने मोठा असल्यास साबणदाणीच्या आकारानुसार कात्रीने कापून घ्या.आता हा स्पंज साबणदाणीमध्ये ठेवा आणि त्यावर साबण ठेवा. अंघोळीनंतर ओला साबण स्पंजवर ठेवल्यास स्पंज त्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेईल.

5 / 6
यामुळे साबणाच्या खालच्या बाजूला पाणी साचण्याचं प्रमाण कमी होईल. तसेच साबणाला हवा मिळाल्यामुळे तो लवकर सुकण्यास मदत होईल. याशिवाय, स्पंजमध्ये साचलेल्या साबणाच्या फेसाचा उपयोग नंतर बाथरूममधील टाइल्स किंवा वॉशबेसिन स्वच्छ करण्यासाठीही करता येऊ शकतो. मात्र, यासाठी स्पंज स्वच्छ ठेवणं आणि त्यात दुर्गंधी किंवा बुरशी निर्माण होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या दोन सोप्या घरगुती युक्त्या वापरून तुम्ही साबण सतत ओला राहण्यापासून वाचवू शकता. त्यामुळे साबण लवकर विरघळण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचा अधिक काळ वापर करता येईल.

6 / 6
Follow Us
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ