Emraan Hashmi : लाज वाटली नाही का? ‘मर्डर’मध्ये इमरान हाश्मीसोबत इंटिमेट सीन, मल्लिका शेरावत हिचं स्पष्टीकरण
अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री मल्लिका शेरावत स्टारर 'मर्डन' सिनेमाची सध्या चर्चा सुरु आहे. एका मुलाखतीत मल्लिका हिने सिनेमातील इंटिमेट सीवर स्पष्टीकरण दिलं आहे. सांगायचं झालं तर, इमरान सध्या 'आवारापन 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. पण मल्लिकासोबतच्या केमिस्ट्री प्रचंड गाजही होती.

'मर्डर' सिनेमातील इमरान आणि मल्लिका यांचे इंटिमेट सीन तुफान गाजले होते. दरम्यान एका मुलाखतीत, मल्लिकाने इमरान याच्यासोबत दिलेल्या बोल्ड सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त मल्लिका आणि इमरान यांच्या बोल्ड सीनची चर्चा रंगलेली.

मल्लिका म्हणालेली, 'आम्ही तेव्हा खूप लहान होतो आमचे इगोमध्ये आले आणि इंडस्ट्रीमध्ये कानही खूप भरले जातात. मला खूप चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या...', इमरान बद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलंय

'इमरान एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे... त्याच्यासोबत शुटिंगच्या अनेक आठवणी देखील माझ्यासोबत आहेत. सिनेमात इंटिमेट सीन शूट करताना त्याने मला खूप सुरक्षित भासू दिलं. त्याच्यासोबत पुन्हा काम करायला मला आवडेल...' असं देखील मल्लिका शेरावत म्हणाली.

मल्लिका पुढे म्हणाली, 'मर्डरमधील भिगे ओंठ तेरे गाण्यावरुही ट्रोलिंग झालं होतं. एका चॅनलमध्ये मुलाखतीसाठी गेले असताना मला एक प्रश्न विचारण्यात आलेला.' त्या प्रश्नावर अभिनेत्री स्पष्टच उत्तर दिलं होतं.

'त्या न्यूज अँकरने मला गाण्याचे लिरिक्स वाचून दाखवले आणि तुम्हाला लाज वाटली नाही का? असं देखील त्याने मला विचारलं. यावर मी म्हणाले, 'मला लाज तर वाटली नाही, मला तर मज्जा आली...', सध्या मल्लिका चर्चेत आली आहे.