शरीर माणसाचं, डोकं कुत्र्याचं…, पुरुषाला का घ्यावं लागलं असं रुप? नेमकं काय आहे प्रकरण

शरीर माणसाचं आणि डोकं कुत्र्याचं... हे ऐकून तुम्हाला देखील फार मोठा धक्का बसला असेल. पण एका व्यक्तीने असं केलं आहे. पुरुषाने एका भटक्या कुत्र्याचं रुप घेतलं आहे. ज्यमुळे सर्वांना प्रश्न पडला व्यक्तीने नेमकं असं का केलं. जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल

| Updated on: Aug 19, 2026 | 3:40 PM
1 / 5
 मध्य प्रदेशातील खंडवा येथे मंगळवारी आयोजित जन-समस्या निवारण बैठकीत एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि त्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दीपक (मुल्लू) राठोड हे एका व्यक्तीला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक कक्षात पोहोचले.

मध्य प्रदेशातील खंडवा येथे मंगळवारी आयोजित जन-समस्या निवारण बैठकीत एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि त्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दीपक (मुल्लू) राठोड हे एका व्यक्तीला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक कक्षात पोहोचले.

2 / 5

त्या व्यक्तीने कुत्र्याचा मुखवटा घातला होता. त्या व्यक्तीचे शरीर माणसासारखं होतं, परंतु चेहरा मात्र कुत्र्याचा होता. या आगळ्यावेगळ्या पद्धतीचा अवलंब करून, राठोड यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर मांडला.

3 / 5

राठोड यांचा आरोप आहे की, गेल्या चार वर्षांत खंडवामध्ये महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीवर सुमारे 40 लाख रुपये खर्च केले; तरीही, भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतंच चालली आहे. या काळात शहरात कुत्र्यांनी चावल्याच्या 13 हजार 225 घटनांची नोदं झाल्याचा दावा देखील त्यांनी केला.

4 / 5

मात्र, जेव्हा ती व्यक्ती कुत्र्याचा वेश परिधान करून आली, तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहाबाहेर रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु नंतर अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आत जाण्याची परवानगी देण्यात आली.

5 / 5

कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. सहा महिन्यांत तब्बल 18 हजारांहून अधिक डॉग बाईटच्या नोंदी आहेत. गेल्या वर्षी 2025 मध्ये कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालयात 21 हजार 165 डॉग बाईटची नोंद झाली आहे, तर यंदा अवघ्या सहा महिन्यांतच 18 हजार 447 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us