महाराष्ट्राची क्रश, रसिकाच्या नवीन लुकने केलं सर्वांनाच घायाळ, सौंदर्य पाहून…
रसिका सुनीलचा साडीतील मनमोहक अंदाज; ‘नॅशनल क्रश’च्या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव. सौंदर्य पाहून सर्वजण करत आहेत कौतुक.

मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आपल्या दमदार अभिनयासोबतच ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमुळे रसिकाने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते तिला प्रेमाने ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही संबोधतात.
नुकतेच रसिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साडीतील काही सुंदर आणि मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रसिकाने गडद पोपटी अर्थात ऑलिव्ह ग्रीन रंगाची साडी नेसली असून, त्यासोबत मल्टीकलर फ्लॉवर प्रिंट आणि सुंदर एम्ब्रॉयडरी असलेला स्लीवलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
हिरव्या रंगाच्या बांगड्या, मोकळे सोडलेले केस आणि सौम्य मेकअपमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे. ‘Blending in or Standing out?’ अशी कॅप्शन देत रसिकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.