
नुकतंच 29 फेब्रुवारीला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला तुमच्या लाडक्या कलाकारांनी हजेरी लावली होती. डान्स, फोटोशूट आणि धमाल यावेळी करण्यात आली. याच सोहळ्याचे काही फोटो. अभिनेत्री पूजा सावंत आणि गश्मिर महाजनी या परफेक्ट जोडीनं आपल्या डान्सद्वारे धमाल केली.

अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओकनं रेड कार्पेटवर चारचाँद लावले.

अभिनेता शिव ठाकरेनं रेड कार्पेटवर धमाका केला.

गश्मिर महाजनीनं आपल्या डान्सचा जलवा दाखवला.

पूजा सावंतनं सुंदर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सर्वांची मनं जिंकली.

सोशल मीडिया क्विन मिथिला पालकरनं आपल्या स्टाईलनं रेड कार्पेटवर एंट्री केली.

महाराष्ट्राचा लाडका माणुस अभिनेता सिद्धार्थ जाधवनं अँकरींग आणि डान्सनं जादू दाखवली.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचाही लूक प्रचंड स्टायलिश होता.

मिस्टर अँड मिसेस खरेरानं धमाकेदार एंट्री केली. दोघंही यावेळी प्रचंड सुंदर दिसत होते.

अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना ‘स्माईल प्लीज’या चित्रटासाठी पुरस्कार प्राप्त झाला.

अमृता खानविलकर सुंदर काळ्या ड्रेसमध्ये फ्लाँट करताना दिसली. ती कमालीची सुंदर दिसत होती.