Mayuri Deshmukh: मालिका अर्धवट सोडलेली यामुळे पार्ट-2 येणार…मयुरी देशमुख ‘खुळता कळी खुलेना पार्ट-2’ वर स्पष्टच म्हणाली…

Mayuri Deshmukh News: मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री मयुरी देशमुखने कमी कालावधीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

| Updated on: Nov 16, 2026 | 3:09 PM
1 / 5
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे तिला घरोघरी ओळख मिळाली.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे तिला घरोघरी ओळख मिळाली.

2 / 5

खुलता कळी खुलेना या मालिकेनंचर ती बरेच दिवस कुठेच दिसली नव्हती. खूप वर्षांच्या ब्रेकनंचर मयुरी थेट हिंदी मालिकेत व्हिलनच्या भूमिकेत दिसली होती. आता तिनं एका मुलाखतीत खुळता कळी खुलेना मालिकेता पार्ट-२ येणार का असा प्रश्न विचारण्यात आला.

3 / 5

मयुरी म्हणाली की," लाखो, कोट्यवधी लोक आम्हाला मॅसेज करतात, त्यातला पर्सनल पश्न तू विचारलेला प्रश्न आहे. ज्या नोटवर आम्ही मालिका सोडली ना, त्यामुळे आम्हाला खूप लोक विचारतात की पार्ट-२ येणार का?"

4 / 5

"ज्या नोटवर आम्ही मालिका संपवली ते कोणालाच आवडलं नाही, मालिका अर्धवट सोडल्यामुळे हाच प्रश्न इतक्यांदा विचारण्यात आला आहे. मला नाही वाटतं की येईल पार्ट-२, पण काही सांगता येत नाही. मी मेनिफेस्ट करते आता बघू" असं मयुरी म्हणाली.

5 / 5

मयुरी देशमुखच्या नवऱ्याने गळफास लावली होती. लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनमुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचलले होते. वयाच्या २८ व्या वर्षी तिने पतीला गमावलं. यामुळे ती खचली होती पण आता तिने जोरदार कमबॅक केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us