MI vs RCB : मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या टीमसमोर स्पष्ट बोलला की, आता दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे..

MI vs RCB : आयपीएल 2026 टुर्नामेंटमध्ये मुंबई इंडियन्सची सुमार कामगिरी सुरु आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही ठिकाणी टीमचं काहीतरी चुकतय. आता हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या या पराभवावर बोललाय.

| Updated on: Apr 13, 2026 | 2:55 PM
1 / 5
मुंबई इंडियन्सने काल आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये पराभवाची हॅटट्रिक केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला. मुंबई टीमची या स्पर्धेत अत्यंत सुमार कामगिरी सुरु आहे. त्यांचा हा सलग तिसरा पराभव आहे.

2 / 5
मुंबई इंडियन्सच्या या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पंड्याने ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंशी संवाद साधला. त्याने टीमला मार्गदर्शन केलं. बंगळुरुने काल 20 ओव्हर्समध्ये 240 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 222 धावा केल्या.

3 / 5
मॅचनंतर ड्रेसिंग रुममध्ये बोलताना हार्दिक पंड्या बोलला की, 'आपण वेगवेगळे जाऊन बसणार त्यापेक्षा आपण एकत्रितपणे बसू. या पराभवावर विचारमंथन करु' हार्दिक पंड्याचा कॅप्टन म्हणून मुंबई इंडियन्स सोबत तिसरा सीजन आहे.

4 / 5
"आता आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे आपल्या रुममध्ये जाऊन काय चुकलं ते शोधून काढणं. हरणं खूप कठीण असतं. पण आपण त्यातून काहीतरी शिकू. नेहमी जिंकणं आणि शिकणं असतं. हरणं हे नसतं. ते आपण करु" असं हार्दिक पंड्या बोलला.

5 / 5
"हॉटेलमध्ये रुमवर गेल्यानंतर आपण एकत्र जेवण करु. आपण क्रिकेटबद्दल बोलू. आपण अजून काहीतरी बोलू. पण आपण काय चुकतय ते शोधू" असं हार्दिक पंड्या बोलला. आम्ही खूपच धावा दिल्या असं हार्दिक मॅच संपल्यानंतर बोलला.

Follow Us