ही दारू सर्वात विषारी, एक झाकण पिलं तरी थेट मृत्यू, बॉटलवरील सूचनेचं पालन न केल्यास…
आपल्या देशात तसेच जगात मद्यप्रेमींची कमी नाही. मद्यप्रेमी वेगवेगळी मद्ये मोठ्या आवडीने पितात. परंतु काही मद्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे अशी मद्यं पिताना काळजी घ्यावी लागते.

मद्यप्रेमींना वेगवेगळ्या प्रकारचे मद्य प्यायला आवडते. काही मद्यांची किंमत खूप जास्त असते. तर काही मद्य चवीला चांगले असतात. बिअरमध्ये साधारण 4 ते 8 टक्के अल्कोहोल असते. तर उर्वरित मद्यप्रकारांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते.

भारतील 50 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या मद्यांची कल्पनाही करणे अवघड आहे. कारण ज्या मद्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त अक्लोहोल असते त्यामुळे लवकर नशा येते असे सांगितले जाते. परंतु या जगात असे काही मद्याचे ब्रँड आहेत, त्यात अल्कोहोलचे प्रमाण खूपच जास्त असते.

अल्कोहोल जास्त असलेले एक झाकण मद्य पिले तरीही थेट मृत्यू ओढावू शकतो, असेही काही मद्यब्रँड आहेत. अशा मद्यांवर खबरदारी म्हणून वेगवेगळ्या सूचनाही दिलेल्या असतात. जास्त अल्कोहोल असलेले हे मद्याब्रँड प्रवासादरम्यान पिणेही धोकादायक मानले जाते.

यात पहिल्या प्रमांकावर येते ते Everclear 190 हे मद्य. हे एक अमेरिकन मद्य असून त्यात एकूण 95 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असते असे बोलले जाते. हे मद्य एवढे घातक आहे की अमेरिकेतील काही राज्यांत त्यावर बंदी आहे. या मद्याला आगीपासून दूर ठेवा अशी स्पष्ट सूचना या मद्याच्या बॉटलवर दिलेली असते.

Bruichladdich X4 Quadrupled नावाची एक व्हिस्की आहे. या व्हिस्कीमध्ये एकूण 92 टक्के अल्कोहोल असतो. ही व्हिस्की तयार करताना त्याला चार वेळा डिस्टील केले जाते. ही एक स्टँग सिंगल मॉल्ट व्हिस्की आहे. अशा प्रकारे अल्कोहोल जास्त असलेली मद्ये, ज्यूस, पाणी यासोबत पिले पाहिजे, असे सांगितले जाते.

(टीप- ही स्टोरी प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. मद्याप्रशानास प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही. मद्याप्रशान आरोग्यास हानिकारक असते. मद्य पिण्याची सवय लागल्यास डॉक्टरांचा, समुपदेशकांचा सल्ला घ्यावा.)