
अमेरिका आणि भारतात बहुप्रतिक्षित व्यापारी करार एकदाचा पार पडला. या करारामुळे भारतीय शेअर बाजार थोडा सावरला. पण बाजारातील शेअरची पडझड थांबलेली नाही. एक रुपयाही कर्ज नसलेल्या कंपनीचा शेअर आपटला आहे. त्यामुळे या कंपनीत ही गुंतवणुकीची योग्य वेळ आहे का, याची गुंतवणूकदार चाचपणी करत आहेत.

Triveni Turbine stock हा 44 टक्के आपटला आहे. या कंपनीची विक्रमी झेप 885 रुपये इतकी होती. हा उच्चांक कंपनीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी गाठला होता. हा शेअर गेल्या 5,10, 20, 30, 50, 100, 150 आणि 200 दिवसांच्या सरासरीपेक्षा निच्चांकी ट्रेड करत आहे. हा शेअर लाल रंगात न्हाऊन निघाला आहे.

एका वर्षात हा स्टॉक 14 टक्क्यांनी घसरला तर एका महिन्यात 8 टक्क्यांनी खाली आला. त्रिवेणी टर्बाईनचा 52 आठवड्यातील निच्चांक हा 454.40 रुपये आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारी रोजी हा शेअर धडपडला आणि निच्चांकावर कोसळला. तेव्हापासून या शेअरला सावरायला संधी मिळाली नाही.

त्रिवेणी टर्बाईनमध्ये 492.80 रुपयांच्या 2.5 टक्के घसरला. अर्थात या कंपनीचे मार्केट कॅप 15,827 कोटी रुपयांवर आहे. एकूण 0.19 लाख शेअर्स बदलले. तर त्याची उलाढाल 95.80 कोटी रुपये इतकी आहे. शेअरमधील घसरण ही खरंच फायद्याची आहे का? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे.

गेल्या पाच वर्षात या स्टॉकने कमाल कामगिरी केली आहे. या पाच वर्षात या शेअरने 446 टक्क्यांचा परतावा दिला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. या कंपनीवर एक रुपयाही कर्ज नाही. त्यामुळे अनेकांना ही कंपनी खुणावत आहे. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. फर्मनुसार हा शेअर 615 रुपयांपर्यंत उसळी घेईल.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.