
मुंबईतील वरळी विभागातील प्रभाग क्रमांक 197 चे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी आज बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

वरळी विभागातील अनेक प्रलंबित विकासकामे आणि पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत याकरिता शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

वरळी विभागातील अनेक झोपडपट्ट्या आजही पुनर्विकासापासून वंचित आहेत.

त्यामुळे आता नव्या दमाने कामाला लागून वरळीमध्ये शिवसेनेला अधिक बळकट करू अशी ग्वाही त्यांनी यासमयी बोलताना दिली.

यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करताना त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.