Nashik Tapovan Controversy : नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार…. पालिका अधिकाऱ्यांना गिरीश महाजन यांनी झापलं
नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी चुकीच्या वृक्षारोपण पद्धतीवरून चांगलेच खडसावले आहे. पाच बाय पाच फुटांवर मोठे वृक्ष कसे लावणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. यामुळे महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नाशिक महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृक्ष लागवडीसाठी चुकीच्या पद्धतीने खड्डे खोदल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा ही चूक झाल्याने महाजन यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पाच बाय पाच फुटांवर वडाचे झाड लावणार आहे का? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे?” असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. वृक्षारोपणातील या गोंधळासोबतच नाशिक महापालिका अनेक वादांनी घेरलेली आहे. तपोवनच्या जंगलात प्रस्तावित २२० कोटींचे प्रदर्शन केंद्र पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे रद्द करावे लागले. फाशीच्या डोंगरावर लावलेल्या झाडांची दुरवस्था, साधुग्रामसाठी चुकीच्या नोटिसा काढणे आणि रामटेकडीमध्ये शेकडो झाडे तोडणे यांसारख्या घटनांमुळे महापालिकेचा कारभार गेल्या १५ दिवसांपासून चर्चेत आहे. महाजनांच्या ताशेरेबाजीने या वादांना आणखी हवा दिली आहे.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?

