
अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी हा हाय प्रोफाईल शाळेत जातो. पृथ्वी हा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश - श्लोका यांचा हा मुलगा आहे.

पृथ्वी अंबानी ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचे नाव नीता मुकेश अंबानी ज्युनिअर स्कूल (NMAJS) आहे. या शाळेला बॅकालॉरिएट वर्ल्ड स्कूलचा दर्जा मिळालेला आहे.

नीता मुकेश अंबानी ज्युनिअर स्कूलमध्ये मुलं सुरुवातीचे शिक्षण इंटरनॅशनल बॅकालॉरिएटच्या प्रायमरी इयर्स प्रोग्रॅम (PYP) अंतर्गत होते.त्यानंतर मिडल इयर्स प्रोग्रॅम (MYP) शिकवला जातो. या शाळेचे दोन मोठे कँपस आहे. एक वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC)आहे आणि दूसरे जिओ वर्ल्ड सेंटर येथे आहे.

नीता मुकेश अंबानी जूनिअर स्कूलची एका वर्षांची फी 14 लाख रुपयांपासून 20 लाखरुपयांदरम्यान आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचाच (DAIS) एक भाग आहे. पृथ्वी अंबानी याचे आजोबा देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले आहेत.