देखण्या रुद्राणी घोडीची देशात चर्चा, किंमत 1 कोटी 17 लाख, फोटो पाहून चकितच व्हाल!

सध्या नंदुरबारमध्ये घोड्यांचा बाजार बरला आहे. या बाजारात एकापेक्षा एक घोडे दाखल होत आहेत. याच बाजारातील रुद्राणी घोडीची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या घोडीमध्ये असं काय आहे, असा प्रश्न विचारला जातोय.

| Updated on: Dec 06, 2025 | 5:00 PM
1 / 5
नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या महेश्वर येथून आलेली रुद्राणी नावाची घोडी दाखल झाली असून या घोडीची किंमत हजारो आणि लाखात नव्हे तर करोडो रुपये आहे. पंजाबच्या पुष्कर येथे रुद्र आणि या घोडीला एका अश्वप्रेमींनी एक कोटी १७ लाखात मागणी केली होती.

2 / 5
 मात्र या घोडीचे मालक विजय यादव यांनी ही घोडी विकण्यास नकार दिला होता. या घोडीत असं काय खास आहे, ज्यामुळे त्या घोडीची किंमत तब्बल एक कोटी १७ लाख रुपये आहे, असे आता विचारले जात आहे.

3 / 5
सारंगखेड्याच्या यात्रेत रुद्रणी घोडी दाखल झाली असून ती रुद्राश चेमपूरवालेची मुलगी आहे आणि राज नगीनाची नात आहे. ही रुद्राणी अवघ्या २२ महिन्याची आहे. मात्र तिचं उंची ६५ इंचपेक्षा अधिक असल्याने ती पूर्ण घोडे बाजारात सर्वात उंच घोडी आहे. त्यामुळे रुबाबदार अशी रुद्राणीला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.

4 / 5
रुद्राणी घोडी जितकी सुंदर आहे तितकाच तिचा खुराकदेखील मोठा आणि जास्त आहे. रुद्राणीला रोज आठ लिटर गाईचे दूध, बिसलरी पाणी, गहू आणि हरभऱ्याच्या भुसा दिला जातो. सकाळ-सायंकाळी तिची चांगल्या पद्धतीने एक तास मालिश केली जाते. त्यानंतर तिला खायला १०० ग्रॅम मोहरीचं तेलं दिलं जातं.

5 / 5
संगखेड्याच्या या बाजारात करोडोचे घोडे मिळत असतात. संगखेड्याच्या बाजारात रुद्राणी घोडी विक्रीसाठी आलेली नाही. मात्र तिला पाहायचे असणार तर एकदा आश्वांच्या पंढरीत भेट देण्याचे आवाहन केले जात आहे.