शेजाऱ्याच्या एसीमुळे घरात प्रचंड गरम होतंय? सांगूनही मशीन हलवत नाहीत? भांडण न करता घर थंड ठेवण्यासाठी करा हे उपाय
शेजाऱ्याच्या एसीमुळे घरात गरम हवा येत असल्यास लगेच वाद घालण्याची गरज नाही. आधी काही सोपे उपाय करून पाहा आणि गरज पडल्यास शेजाऱ्यांशी शांतपणे चर्चा करा.

उन्हाळ्यात प्रचंड गरम होत असतं.त्यामुळे घराच्या खिडकीवर आपण ठाण मांडून बसतो. वाऱ्याची छोटीशी झूळूक मनाला शांतता देते. काही काळ थंडावा देते. घरातही हवा खेळती राहते. पण शेजाऱ्याच्या एसीमुळे गरम वाफांची लाट आपल्या घरात येते. त्या गरम हवेमुळे नेहमीपेक्षाही जास्त गरम होतं. त्यामुळे डोकं आणखी तापतं.
हजारवेळा सांगून देखील जर शेजारी ऐकत नसेल तर शांत व्हा. वाद घालूनही काही फरक पडत नसेल तर तुमची एनर्जी वाया घालवू नका. त्यापेक्षा या काही टिप्स करा ज्यामुळे गरम हवेचा त्रास होणार नाही.
शेजाऱ्याच्या एसीची गरम हवा ज्या खिडकीतून घरात येते, ती खिडकी गरज नसताना बंद ठेवा. विशेषत: बाहेरची हवा गरम असताना खिडक्या उघड्या ठेवल्यास घरातील तापमान वाढू शकतं.
खिडक्यांमधून येणारी गरम हवा कमी करण्यासाठी जाड किंवा गरम हवा परतून लावणारे पडदे लावा. म्हणजे ज्याची गरम हवा परत त्याच्याकडेच जाईल, आपल्याला काही त्रास नाही.
खिडकीच्या चौकटीत किंवा दरवाज्याच्या कडांना फटी असतील, तर त्यातून गरम हवा घरात येऊ शकते. या फटी बंद करण्यासाठी सीलींग पट्ट्यांचा वापर करा.
हे उपाय करून देखील फरक न जाणवल्यास शेजाऱ्यांना पुन्हा शांतपणे समजावून सांगा. फक्त भांडणं न करता तुम्हाला होणारा त्रास त्यांना स्पष्टपणे सांगा. मशीनची दिशा बदलणे किंवा वेगळ्या ठिकाणी बसवणे शक्य आहे का यावर चर्चा करा. अनेकदा शांतपणे बोलल्यावर तोडगा निघतो
शेजाऱ्यांशी बोलूनही प्रश्न सुटत नसेल तर सोसायटीच्या सेक्रेटरी कडे तक्रार करा. मशीन बसवण्यासंबंधी सोसायटीचे नियम समजून घ्या. गरज गृहनिर्माण व्यवस्थापनाकडे तक्रार करा.