Free CNG Kit : दिवाळीच्या मुहूर्तावर ‘ही’ कंपनी देणार कार सोबत CNG किट फ्री
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावार अनेक लोक कार विकत घेतात. प्रत्येक वर्षी दिवाळीत प्रत्येक कंपनी सेल किंवा ऑफर काढत असते. पण एका कंपनीने अशी ऑफर काढली आहे, की ज्यामध्ये तुम्ही कार खरेदी केलात तर त्यासोबत CNG किट फ्रिमध्ये मिळणार आहे.

CAR WITH CNG KIT FREE
Image Credit source: SOCIAL MEDIA
- दिवाळीच्या काळात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. नवीन कार खरेदी केल्यावर तुम्हाला त्यावर कंपनी तब्बल 86 हजारांचे CNG किट फ्रिमध्ये देणार आहे.
- निसानने ग्राहकांसाठी खास ऑफर आणलील आहे. कंपनीच्या Magnite आणि Gravite या दोन गाड्यांच्या निवडक प्रकारांवर आता सरकारी मान्यताप्राप्त CNG किट फ्रिमध्ये देणार आहे.
- निसानच्या या ऑफरमध्ये Magnite साठी मिळणाऱ्या CNG किटची किंमत 74,999 रूपये आहे. तर Gravite साठी या किटची किंमत 85,999 आहे. म्हणजेच ग्राहकांना वाहनाच्या प्रकारानुसार जवळपास 75 ते 86 हजारांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे.
- निसान Magnite च्या नॉन- टर्बो प्रकारांवर ही ऑफर लागू आहे. मात्र, Visia MT, Visia EZ-Shift आणि Visia+ MT या प्रकारांना या ऑफरमधून वगळण्यात आलं आहे.त्यामुळे इतर पात्र नॉन-टर्बो प्रकार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत CNG किटचा लाभ घेता येईल. टर्बो पेट्रोल प्रकारांवर ही ऑफर लागू नाही.
- Gravite वर कोणाला मिळणार लाभ: निसानच्या 7 सीटर Gravite गाडीच्या केवळ Tenka प्रकारांवर ही ऑफर उपलब्ध आहे. या गाडीसाठी मिळणाऱ्या CNG किटची किंमत 85,999 रूपये आहे.या किटमध्ये दोन सिलिंडरची रचना देण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या रांगेतील सीटचा वापर कायम ठेवण्यास मदत होईल.
- किटसोबत मिळणार वॉरंटी : या दोन्ही CNG किटवर 3 वर्ष किंवा 1 लाख किमीची वॉरंटी देण्यात येणार आहे. ही वॉरंटी कंपनीच्या वाहनाच्या मूळ वॉरंटीपेक्षा वेगळी आहे.
- दरम्यान ज्यांना CNG किट नको आहे त्यांच्यासाठी काही इतर पर्यायही देण्यात आले आहेत. Magnite वर 1 लाख रूपयांपर्यंतचे फायदे आणि सोन्याचं नाणं तर Gravite वर 55 हजार रूपयांपर्यंतचे फायदे आणि सोन्याचं नाणं मिळू शकतं
- मात्र या ऑफरची मुदत 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा लवकरात लवकर लाभ घ्यावा हे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us