Photo : काही तरी घडतंय? हे कसले संकेत?…. मीरा भाईंदरमध्ये समुद्र खवळला!

मीरा भाईंदरमधील उत्तनमध्ये समुद्र खवळलेला असून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत.या जोरदार लाटांमुळे किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

| Updated on: Jun 26, 2025 | 11:39 PM
1 / 6
मीरा भाईंदरमधील उत्तनमध्ये समुद्र खवळलेला असून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत.या जोरदार लाटांमुळे किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे.काही ठिकाणी समुद्राच्या लाटा थेट घरांच्या हॉलमध्ये घुसल्याने मोठं नुकसान झालं आहे.स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

2 / 6
मिरा-भाईंदर शहरातील उत्तन परिसरात समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घरांमध्ये आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक उंच लाटा घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. समुद्रात झालेल्या भरणीमुळे लाटांचे स्वरूप अधिकच भयंकर झाले असून,पाण्याचे प्रमाण थेट घरांच्या हॉलपर्यंत पोहोचले आहे.

3 / 6
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सकाळच्या सुमारास समुद्रात जोरदार लाटा उसळू लागल्या आणि काही क्षणांतच त्या किनाऱ्यावरून थेट घरांमध्ये शिरल्या.विशेषतः उंच लाटांनी काही घरांचे नुकसानही केले असून, घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

4 / 6
भविष्यात अशा प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच, किनाऱ्यालगतच्या भरणीचे नियोजन व पर्यावरणीय परिणाम यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज अधोरेखित होत आहे.

5 / 6
नागरिक सध्या सुरक्षित स्थळी स्थलांतर करत असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेली आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र प्रशासन सतर्क आहे. समुद्रात भरणीमुळे लाटांची तीव्रता वाढली असून लाटा थेट घरांच्या आत शिरल्या.

6 / 6
घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे उत्तन परिसरातील नागरिक पुन्हा एकदा किनारपट्टीच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधू लागले आहेत.