आज बालहक्क दिन! मुंबईतल्या प्रमुख वास्तू का सजवल्यात निळ्या रंगात? जाणून घ्या

| Updated on: Nov 20, 2023 | 1:36 PM

२० नोव्हेंबरला बालहक्क दिवस साजरा केला जातो. ० ते १८ वयवर्षे असणाऱ्या बालकांचे हक्क काय आहेत? त्याविषयीची जागरूकता आणि माहिती सगळ्यांपर्यंत पोहचावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बालन्याय अधिनियमानुसार बालकांना म्हणजेच ० ते १८ वयवर्षे असणाऱ्या मुलांना ४ हक्क देण्यात आलेत. हे हक्क खूप महत्त्वाचे आहेत. यात जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार आणि सहभागाचा अधिकार याचा समावेश होतो.

1 / 7
बालन्याय अधिनियमानुसार बालकांना म्हणजेच ० ते १८ वयवर्षे असणाऱ्या मुलांना ४ हक्क देण्यात आलेत. हे हक्क खूप महत्त्वाचे आहेत. यात जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार आणि सहभागाचा अधिकार याचा समावेश होतो.

2 / 7
बालक कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही समाजातून असो, कोणत्याही लिंगाचा असो प्रत्येकाला हे अधिकार देण्यात आलेले आहेत.

3 / 7
20 नोव्हेंबर या जागतिक बालहक्क दिनाच्या पूर्व संध्येला मुंबई महानगरपालिका इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,चर्चगेट स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मुंबई निळ्या रंगात सजवण्यात आलंय. राजभवनातील प्रमुख वास्तूंवर निळ्या रंगात रोषणाई करण्यात आलीये.

4 / 7
हा निळा रंग मुलांच्या हक्कांसाठीचे प्रतिक असेल. नोव्हेंबर 19 आणि 20 अशा दोन्ही दिवशी या इमारती निळ्या रंगात सजतील असं युनिसेफकडून सांगण्यात आलंय. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्कांसंबंधी जागतिक करार मंजूर झाल्याच्या निमित्ताने, युनिसेफतर्फे हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा होतो.

5 / 7
या जागतिक बालहक्क दिनी युनिसेफ लिंग समानतेचा पुरस्कार करत सून #BeAChampionForGirls या ब्रीदवाक्यासह मुलींच्या हक्कासाठी आग्रही राहील असं सांगण्यात आलंय.

6 / 7
मुलांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी हा कायदा केला गेलाय. तुम्हाला माहितेय का हा कायदा राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटही स्थापन केलं गेलंय. या युनिटमध्ये सरकारकडून कर्मचारी नेमले जातात.

7 / 7
संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1959 रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला आणि तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो.