Vladimir Putin: मजुराचा मुलगा, आजोबा स्वयंपाकी, KGB चे गुप्तहेर ते 25 वर्षांपासून रशियाचे बॉस, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा प्रवास
Vladimir Putin: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची रशियावर गेल्या 25 वर्षांपासून घट्ट पकड आहे. सोव्हिएत संघाचे विघटन झाले. त्यानंतर रशियाला पुन्हा सर्वोच्च स्थानी आणण्याचा पुतीन यांनी चंग बांधला आहे. ते सध्या भारत भेटीवर आहेत.

Vladimir Putin Biography: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारत आणि सोव्हिएत संघाचे मैत्रीपर्व आज आठ दशकानंतरही कायम आहे. पुतीन यांचा राष्ट्राध्यक्षापर्यंतचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. मजुराचा मुलगा, आजोबा स्वयंपाकी ते गुप्तहेर खात्यातील नोकरी इथपासून ते पुढे राष्ट्राध्यक्षापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांना कदाचित माहिती नसेल. सोव्हिएत संघाचे पतन आणि विघटन झाले. आता रशियाला पुन्हा समृद्धीच्या शिखरावर नेण्याचा चंग भारताच्या या मित्राने बांधला आहे.
पुतीन यांचा प्रवास
पुतीन हे काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाही. त्यांची आई एका कारखान्यात मजुरीचे काम करायची. त्यांचे वडील हे सोव्हिएत संघातील एका बड्या नेत्याच्या घरात स्वयंपाकी होते. पुतीन यांनी लेनिनग्राड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते रशियाची गुप्तहेर संघटना KGB मध्ये 15 वर्षे गुप्तेहर म्हणून काम करत होते. तत्त्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये पुतीन यांना पंतप्रधान केले आणि त्यानंतर इतिहास घडला. तेव्हापासून पुतीन यांच्या एकहाती सत्ता आहे.
पुतीन यांचे आजोबा हे व्लादिमीर लेनिन आणि जोसेफ स्टॅलिन यांच्या घरी स्वयंपाकी होते. पुतीन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राडमध्ये झाला होता. त्यांचे बालपण हे गरिबीत गेले. त्यांना शिक्षणापासून ते जगण्यापर्यंत संघर्ष करावा लागला. वडील स्प्रिदोनोविच पुतीन हे लष्करात भरती झाले. ते दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले. तर परिस्थितीमुळे पुतीन यांना अत्यंत कमी वयात त्यांच्या दोन भावांनाही मुकावे लागले.
पुतीन यांचे कुटुंब
पुतीन यांचे लग्न ल्यूडमिला एलेक्जेंड्रोना यांच्याशी झाला. पण 2014 मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाला. पुतीन यांना दोन मुली मारिया आणि कॅटरिना आहेत. त्या दोघीही राजकारणापासून दूर आहेत. वृत्तानुसार पुतीन यांची एक गर्लफ्रेंड एलिना काबेवा अनेक वर्षांपासून त्यांच्या सोबत आहे. पण त्यांना प्रथम महिलेचा दर्जा प्राप्त नाही. काबेवा या ऑलम्पिक जिमनॅस्टिक विजेता आहे. त्यांनी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. काबेवा या 2007 पासून संसदेत प्रतिनिधीत्व करत आल्या आहेत.
नशिबाला अशी मिळाली कलाटणी
पुतीन यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि ते रशियाच्या गुप्तहेर संघटनेत दाखल झाले. त्यांनी या संघटनेत जवळपास 15 वर्षे काम केले. पुतीन यांनी 6 वर्षे जर्मनीत गुप्तेहर म्हणून काम पाहिले. 1990 मध्ये पुतीन हे लेफ्टनंट कर्नल पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर एक निवृत्तीचे आयुष्य जगण्याच्या विचारात असतानाच त्यांचे नशीब पालटले. सेंट पीटर्सबर्गचे मेयरचे सल्लागार म्हणून त्यांची निवड झाली आणि येथूनच त्यांच्या नशिबाला कलाटणी मिळाली. पुढे त्यांना 1994 मध्ये उपमहापौर म्हणून निवडण्यात आले.
येल्तसिन यांच्यानंतर जबाबदारी
1996 मध्ये पुतीन हे रशियाची राजधान मॉस्कोत दाखल झाले. तिथे त्यांनी अनेक नेत्यांचा विश्वास जिंकला. बोरिस येल्तसिन यांनी जुलै 1998 मध्ये पुतीन यांना फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसिसच्या FSB प्रमुखपदी नेमले. त्यानंतर ते सचिव झाले. तर 1999 मध्ये येल्तसिन यांनी त्यांना उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले. पुतीन यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
