AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : कधीच विसरू शकणार नाही, अशी पोलिसांकडून भेट… 12 वर्षापूर्वी हरवला, ईदच्या दिवशी सापडला

मालाड पोलिसांनी ‘भिक्षेकरू कारवाई’ मोहिमेअंतर्गत ईदच्या निमित्ताने एका मुस्लिम कुटुंबाला अशी भेट दिली, जी ते कधीच विसरणार नाहीत. ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी.

| Updated on: May 28, 2026 | 1:30 PM
Share
मुंबईतील मुंबई पोलीस यांच्या मालाड पोलीस ठाण्याने ईदच्या निमित्ताने एका कुटुंबाला आयुष्यभर लक्षात राहील अशी अनोखी भेट दिली. तब्बल 12 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या मुलाचा शोध घेत पोलिसांनी त्याची आपल्या आई-वडिलांशी पुन्हा भेट घडवून आणली. ईदच्या दिवशी झालेल्या या भावनिक पुनर्भेटीमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

1 / 6
मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या भिक्षेकरू कारवाई मोहिमेदरम्यान पोलिसांना एक 27 वर्षीय तरुण आढळून आला. सुरुवातीला विचारणा केली असता त्याने स्वतःचा पत्ता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्या बोलण्यात काहीतरी दडवले जात असल्याचा संशय आला.

2 / 6
यानंतर पोलिसांनी संयमाने त्याच्याशी संवाद साधला आणि त्याचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्या तरुणाने आपला खरा पत्ता सांगितला. त्याने आपण साकीनाका येथील टिळक नगर परिसरात, अंजुमन इस्लाम उर्दू स्कूलजवळ राहत असल्याची माहिती दिली.

3 / 6
यानंतर मालाड पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित तरुण तब्बल 12 वर्षांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. दुसरी इयत्तेत नापास झाल्यानंतर भीतीपोटी त्याने घर सोडल्याचे समोर आले.

4 / 6
कुटुंबीयांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला होता, मात्र त्याचा शोध लागला नव्हता. कालांतराने त्याचे आई-वडीलही मुंबईतील मुंब्रा परिसरात नातेवाईकांच्या शेजारी राहायला गेले होते.

5 / 6
मालाड पोलिसांनी तत्काळ त्या तरुणाच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. ईदच्या दिवशी तब्बल 12 वर्षांनंतर आई-वडिलांसमोर मुलगा उभा ठाकल्याने सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

6 / 6
Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल

अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...

मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?