पाकिस्तानमध्ये 1 GB डेटाची किंमत किती? दर महिन्याचा खर्च तब्बल…

पाकिस्तानमध्ये इंटरनेटचे दर भारतापेक्षा कितीतरी जास्त आहेत. १ जीबी डेटाची किंमत पाकिस्तानमध्ये सुमारे ३० रुपये तर भारतात १२-१४ रुपये आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना सोशल मीडिया आणि ऑनलाइन शिकण्यासारख्या सुविधांचा वापर करणे महाग पडते.

| Updated on: May 11, 2025 | 2:07 PM
1 / 10
सध्याच्या काळात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. आपण दररोज तासनतास व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर घालवत असतो. भारतात इंटरनेट खूप स्वस्त आहे.

2 / 10
पण पाकिस्तानात इंटरनेटसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागू शकतात,  याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

3 / 10
पाकिस्तानमध्ये १ जीबी इंटरनेट डेटाची सरासरी किंमत सुमारे ३० रुपये इतकी आहे. तर भारतात हाच डेटा १२-१४ रुपयांना सहज उपलब्ध आहे.

4 / 10
जर कोणी पाकिस्तानमध्ये दररोज १ जीबी डेटा वापरत असेल तर त्याला दर महिने सुमारे ९०० रुपये खर्च करावे लागतात. भारतात हाच खर्च दरमहा ३००-४०० रुपये येतो.

5 / 10
पाकिस्तानातील अनेक लोक व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारखे अॅप्स वापरण्यासाठी भारतापेक्षा दुप्पट पैसे खर्च करतात. यामुळे या ठिकाणी राहणारे लोक सोशल मीडिया आणि व्हिडीओ अॅप्स वापरताना विचार करतात.

6 / 10
केवळ भारतातच नाही तर बांगलादेशमध्येही इंटरनेट पाकिस्तानपेक्षा स्वस्त आहे. बांगलादेशमध्ये १ जीबी डेटाची किंमत सुमारे २६ रुपये असून ती पाकिस्तानपेक्षा ४ रुपयांनी कमी आहे.

7 / 10
पाकिस्तान हा दक्षिण आशियातील सर्वात महाग इंटरनेट वापरत असलेल्या देशांपैकी एक आहे.

8 / 10
पाकिस्तानमधील महागड्या इंटरनेटचा परिणाम तेथील लोकांवर स्पष्टपणे दिसून येतो. त्या ठिकाणी राहणारे अनेक तरुण ऑनलाईन क्लासेस, फ्रीलान्सिंग किंवा डिजिटल मार्केटिंग यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतात.  त्यांच्यासाठी डेटा खरेदी करणे कठीण असते.

9 / 10
तर दुसरीकडे भारतासारख्या देशात, परवडणारे इंटरनेट डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देत आहे.

10 / 10
जर आपण सर्वात स्वस्त इंटरनेट कुठे उपलब्ध आहे याबद्दल बोललो तर वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा इस्रायलमध्ये उपलब्ध आहे. या १ जीबी डेटाची सरासरी किंमत ०.०४ अमेरिकन डॉलर (सुमारे ३.४२ रुपये) इतकी आहे. तसेच इटलीमध्येही सर्वात स्वस्त इंटरनेट आहे. इटलीमध्ये फक्त ९.९१ रुपयांमध्ये १ जीबी डेटा उपलब्ध आहे.