Photos : ‘पारू’ फेम अभिनेत्रीच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष; मांजरासोबतची खास केमिस्ट्री पाहून चाहतेही फिदा
‘पारू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजना काळे सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. एका क्यूट मांजरासोबतचे फोटो शेअर करत तिने खास कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलंय.

मराठमोळी अभिनेत्री संजना काळेने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एका मांजरासोबत दिसत आहे. तिच्या या खास फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
संजना एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री असून तिने अनेक प्रसिद्ध मराठी मालिका गाजवल्या आहेत. तिची 'पारू' ही मालिका प्रचंड गाजली.
पारू मालिकेमध्ये तिने प्रिया नावाचं पात्र साकारलेलं. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. तिचे इन्स्टाग्रामवरही भरपूर फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या सोशल हालचालींवर त्यांचं विशेष लक्ष असतं.
आता ताज्या शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती एका क्यूट मांजरासह दिसत असून तिने या फोटोंना शेअर करताना My kind of companionship असं कॅप्शन दिलं आहे.
संजनाच्या या फोटोंना तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक केलं असून अनेकांनी खास कमेंट्सही केल्या आहेत. तिच्या अनेक रिल्सही प्रचंड व्हायरल झालेल्या आहेत. तिला चांगला डान्सही येतो.
(सर्व फोटो सौजन्य- संजना काळे इन्स्टाग्राम)