
पुण्यात परतीच्या पावसाने वेग धरला आहे. त्यामुळे 2019 सारखी परिस्थिती पुण्यात पुन्हा होताना दिसत आहे. जोरदार पावसाने धुमाकूळ घातला असल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले.

पुण्यात नागरीकांच्या घरातच नाही तर पोलीस ठाण्यातही पाणी शिरलं आहे.

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी भरलं.

सध्या पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात साचलेलं पाणी काढण्याचे काम करत आहेत.