हरितालिकेच्या पूजासाहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम, शिर्डीतील बनावट पूजासाहित्य विक्रेत्यावर नगरपरिषदेची कारवाई

हरितालिकेच्या पूजा साहित्यात चक्क प्लास्टिकच्या बदामाची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

| Updated on: Sep 14, 2026 | 8:30 PM
1 / 4
शिर्डी शहरामध्ये पूजेच्या साहित्याच्या दुकानावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.शिर्डी शहरामध्ये थाटलेल्या पूजा विक्री साहित्याच्या दुकानात हरतालिकाच्या पूजेच्या साहित्यात चक्क चक्क प्लास्टिकचे बदाम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिर्डी शहरामध्ये पूजेच्या साहित्याच्या दुकानावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.शिर्डी शहरामध्ये थाटलेल्या पूजा विक्री साहित्याच्या दुकानात हरतालिकाच्या पूजेच्या साहित्यात चक्क चक्क प्लास्टिकचे बदाम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

2 / 4

शिर्डी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांने हा प्रकार उघडकीस आणला आहे. शिर्डी नगर परिषदेचा कर्मचारी पूजेचे साहित्य घेण्यासाठी गेला असता त्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने विकत घेतलेल्या हरितालिकेच्या पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टीकचे बदाम आढळल्याने खळबळ उडाली आहे.

3 / 4

कर्मचाऱ्यांना तात्काळ वरिष्ठांना माहिती देत या प्रकाराची माहिती दिली असून शिर्डी नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग आणि MSF विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बनावट पूजेचे साहित्य विकणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

4 / 4

हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने शिर्डी शहरामध्ये थाटलेल्या पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी सुरू केली असून बनावट पूजेचे साहित्य किंवा बनावट वस्तू विक्री करणा-यांवर आता शिर्डी नगरपरिषद प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us