Prajakta Mali : कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची थक्क करणारी पोस्ट, थेट म्हणाली…

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती हिला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. अभिनेत्रीसोबत जे काही घडून गेलं, त्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अशात त्या शेवटच्या रात्री घडलेल्या त्या धक्कादायक घडनेचं गुढ आजही कायम आहे, तर जाणून घ्या थक्क करणारी इनसाईड स्टोरी...

| Updated on: Oct 01, 2026 | 2:04 PM
1 / 5
अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 'जुळून येतील रेशिमगाठी' मालिकेतून त्याने  चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता ललित कबास भूमिकेत दिसणार आहे...

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 'जुळून येतील रेशिमगाठी' मालिकेतून त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता ललित कबास भूमिकेत दिसणार आहे...

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून ललित प्रभाकर 'कसाब'च्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. नुकताच 'प्रहार' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहते सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. अशात कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

3 / 5

सिनेमाचा ट्रेलर इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत प्राजक्ता म्हणाली, 'सुपर... मला तू आदित्यपेक्षा जास्त कसाबच्या भूमिकेतच का जास्त आवडलाय कळेना... असं वाटतंय हा ट्रेलर तुझ्यासाठीच बनला आहे. पण तुझ्यामुळेच मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू शकणार नाही.'

4 / 5

सांगायचं झालं तर, ललित आणि प्राजक्ता यांच्या 'शुभमंगलमय जोडी दंगलम' सिनेमाचं शुटिंग लवकरच सुरु होणार आहे. याच कारणामुळे प्राजक्ता हिला सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता येणार नाही... असं सांगितलं जात आहे.

5 / 5

'प्रहार' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात ललित प्रभाकर कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता राजकुमार सरकारी वकील उज्वल निकरम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिनेमाची कथा 26 / 11 च्या खटल्या भोवती फिरताना दिसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us