
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही दि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात, मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.

यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन येत असल्याने शिवभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन,समितीच्या वतीने विविध कमिट्यांच्या माध्यमातून सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

काल युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती व समितीचे पदाधीकाऱ्यांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन सोहळ्यानिमित्त चाललेल्या पुर्वतयारीचा आढावा घेतला.

येणाऱ्या शिवभक्तांना निवारा, स्वच्छतागृह, महिलांच्यासाठी स्वतंत्र सोय, पिण्यासाठी मुबलक पाणी त्याच बरोबर गड पायथ्याला वाहानतळ, वाहान तळापासून गडाच्या पायथ्या पर्यंत शटल बस सेवा, यासारख्या अनेक गोष्टींचे नियोजन काल करण्यात आले.

कालच्या बैठकीला काही मोजकीचं लोकं बैठकीला उपस्थित होती.

युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती उपस्थितांना मार्गदर्शन केले.