Price Hike : ऐन दिवळीत महागाईचा झटका, डाळ, तांदळाची किंमत थेट…खिशाला मोठी झळ
समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या तोंडावर डाळी तसेच तांदळाचा भाव वाढू शकतो. यामुळे ऐन सणांमध्ये सामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. याच शक्यतेमुळे यंदा दिवाळी साजरी कशी करणार, असा प्रश्न सामान्यांपुढे उभा ठाकलाय.

नागपूर - राज्यात सध्या दुष्काळ आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे सामान्यांपुढे अनेक संकटं उभी राहिली आहेत. असे असतानाच आता ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांना महागाईचा चटका बसणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या तोंडावर डाळी तसेच तांदळाचा भाव वाढू शकतो. यामुळे ऐन सणांमध्ये सामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. याच शक्यतेमुळे यंदा दिवाळी साजरी कशी करणार, असा प्रश्न सामान्यांपुढे उभा ठाकलाय.
डाळीच्या भावात किलोमागे 20 ते 25 रुपये वाढ, तर तांदूळ आणि इतर धान्यांचा भाव प्रति किलो 15 रुपयांना वाढू शकतो. तसा अंदाज व्यक्त केला जातोय. ही शक्यता लक्षात घेऊनच नागरिकांनी नियोजन करावे, असे आवाहन केले जातेय.
दुष्काळामुळे राज्यात डाळीचे उत्पादन कमी झालेले आहे. सोबतच पेट्रोल, डिझेलच्या किमतीतही वाढ झालेली आहे. यामुळे डाळी, धान्याच्या दळणवळणाच्या खर्चात वाढ झालेली आहे. सोबतच राज्यात सध्या पाऊस कमी झाल्यानेही डाळ, भाव यांच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
हीच बाब लक्षात घेऊन नागपूरच्या जिल्हा व्यापारी संघांचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यापाऱ्यांना विनंती केलीय. सामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे असं नियोजन करायला पाहिजे. सामान्य माणसाला झळ पोहचत आहे. त्यामुळे व्यापारी नेते आणि सामान्य नागरिक यांच्यात समन्वय करून तोडगा काढायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केलेय.