AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor : टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यनचा मोठा निर्णय, पोलिसांशी चर्चा केल्यानंतरच…

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.त्यामुळे रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

Ranbir Kapoor :  टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यनचा मोठा निर्णय, पोलिसांशी चर्चा केल्यानंतरच...
RANBEER KAPOOR KARTIK AARYAN Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 26, 2026 | 6:54 PM
Share

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.या घटनेनंतर ‘ऑल स्टार्स फुटबॉल क्लबने’ (ASFC) ने रविवारी होणारी आपला फुटबॉल सराव सत्र पुढील आदेश येईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लबमध्ये रणबीर कपूर कार्तिक आर्यन आणि अभिषेक बच्चन यांसारखे कलाकारही फुटबॉल खेळण्यासाठी सहभागी होतात.

25 ऑक्टोबरचा सामना रद्द

मुंबईतील जुहू परिसरात असलेला जमुनाबाई नरसी स्कूलच्या मैदानावर ऑल स्टार्स फुटबॉल क्लबचे सदस्य दर रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी एकत्र येतात. मात्र 18 ऑक्टोबरला टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव 25 ऑक्टोबरचं सराव सत्र रद्द करण्यात आलं. क्लबचे मालक बंटी वालिया यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व प्रशिक्षणं सत्र थांबवली असल्याचं सांगितलं.

पोलिसांशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय

‘मिड डे’ ला दिलेल्या माहितीमध्ये बंटी वालिया यांनी सांगितलं की सराव सत्र पुन्हा सूरू करण्यापूर्वी पोलिसांशी चर्चा करणं आवश्यक आहे. कलाकारांच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था केल्यानंतरच पुढील सामन्यांबाबत निर्णय घेतला जाईल. असं बंटी वालिया यांनी सांगितलं.

टायगर श्रॉफच्या कारवर नेमकं काय घडलं?

18 ऑक्टोबरला संध्याकाळी टायगर श्रॉफ जुहूमधील फुटबॉल मैदानावरून निघत असताना त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कारच्या दिशेने गोळ्या झाडल्या, या घटनेत टायगर सुरक्षित राहिला. मात्र त्याचा चालक आणि गाडीभोवती असलेला एक फॅन जखमी झाला. या प्रकरणात पोलिंसाकडून चौकशी सुरू आहे.

Follow Us
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी;
LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत,
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण...
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण