Pune Air Hostess : पुण्यातील एअर होस्टेस मित्रासोबत गेली, निर्जन स्थळी जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले, मृतदेह दिसताच खळबळ

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर बालाघाट जिल्ह्यातील वैनगंगा नदी परिसरात पुण्यात कार्यरत असलेल्या 35 वर्षीय एअर होस्टेस वर्षा तुरकर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून त्या दिवाळीनिमित्त नातेवाइकांकडे आल्या होत्या.

| Updated on: Nov 16, 2026 | 5:51 PM
1 / 5
गोंदिया- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांचा संशयास्पद गोंदियात संशयास्पद मृत्यू झालाय. बालाघाट-गोंदिया सीमेवर ही खळबळजनक घटना घडलीय.

गोंदिया- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांचा संशयास्पद गोंदियात संशयास्पद मृत्यू झालाय. बालाघाट-गोंदिया सीमेवर ही खळबळजनक घटना घडलीय.

2 / 5

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर बालाघाट जिल्ह्यातील वैनगंगा नदी परिसरात पुण्यात कार्यरत असलेल्या 35 वर्षीय एअर होस्टेस वर्षा तुरकर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून त्या दिवाळीनिमित्त नातेवाइकांकडे आल्या होत्या.

3 / 5

14 नोव्हेंबर रोजी त्या मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत कारने फिरायला गेल्या असताना, अज्ञात नकाबपोश हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून लूटमार केल्याचा दावा मित्राने केला आहे.

4 / 5

या हल्ल्यात वर्षा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोरांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटल्याचेही सांगण्यात येत आहे.

5 / 5

घटनास्थळ महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलीस संयुक्त समन्वयाने तपास करत आहेत. वर्षा यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण, याचा तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us