सह्याद्रीच्या पर्वतरांगातील वनराई धबधबा ठरतोय पर्यटकांचे खास आकर्षण
पावसाळ्याचा आनंद सर्वत्र वेगळाच असतो. शेतकरी पावसाची वाट पाहत असतो, तसे पर्यटकही पावसाच्या प्रतिक्षेत असतात. पाऊस सुरु होताच सर्वत्र हिरवेगार वातावरण झाल्यावर होते. धबधबे वाहू लागतात अन् पर्यटक वर्षाविहारसाठी वळतात.

राज्यात यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. ऑगस्ट महिन्यात कुठेही मुसळधार पाऊस झालेला नाही. यामुळे वर्षाविहारसाठी जाणाऱ्या पर्यंटकांचा आनंद कमी झाला आहे. परंतु श्रावणात वातावरण सर्वत्र हिरवेगार झाले आहे.

राज्याच्या अनेक भागात पावसाने ओढ दिली असली तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगातील जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे परिसरात पाऊस बरसत आहे. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य ही चांगले बहरले आहे.

जुन्नर तालुक्यात असलेला वनराई धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. हिरवागार निसर्ग दाट धुके आणि उंचावरून वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांनी निसर्ग सौदर्यं फुलून गेले आहे.

पुणे जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. परंतु घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. यामुळे परिसरात असलेले धबधबे प्रवाहित झाले आहे. हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

शनिवार, रविवारी वर्षाविहारसाठी असणाऱ्या पर्यटन स्थाळांवर गर्दी होत आहे. जुन्नर तालुक्यातील वनराई धबधबा पाहण्यासाठी पुणे शहरातील अनेक जण येत आहेत. यामुळे स्थानिक व्यावसायिक समाधानी झाले आहे.