AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणे, तटकरे आणि सामंत… एकाच गाडीतून प्रवास; कोकणात राजकीय चर्चांना उधाण

कोकणात भाजपचे राणे, शिंदे गटाचे सामंत आणि राष्ट्रवादीचे तटकरे या महायुतीतील नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ही अनोखी एकजूट दिसली. तर योगेश कदम यांनी सुनील तटकरे यांची भेट टाळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात राजकीय चर्चांना उधाण
sunil tatkareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 12:19 PM
Share

सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील तिन्ही पक्षांची अनोखी एकजूट पाहायला मिळत आहे. वरच्या पातळीवरील सुसंवाद हा स्थानिक पातळीवरही दिसत आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण आज पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे तीन बडे नेते आज एकत्र भेटले. या तिन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला. तिन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवास केल्याने कोकणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तिन्ही नेत्यांचं चांगलं बाँडिंग झाल्याचंही या निमित्ताने बोललं जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणे, शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात भेट झाली. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी हे तिन्ही नेते एकत्र आले होते. या ठिकाणी या तिन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवास केला. तिन्ही नेते एकाच गाडीतून गेल्याने कोकणातील राजकारणात सध्या चर्चांना उधाण आलं आहे. तिन्ही नेत्यांमध्ये गाडीत काय चर्चा झाली? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कदमांनी भेट टाळली

दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदमही रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात होते. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला कदम यांनीही हजेरी लावली. मात्र, त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांची भेट घेणं टाळलं. तटकरे येताच योगेश कदम यांनी पाठ फिरवली. योगेश कदम यांनी सर्व नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चाही केली. पण सुनील तटकरे यांची भेट घेणं त्यांनी टाळलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दापोली विधानसभा मतदार संघात कदम आणि तटकरे यांच्यात राजकीय वाद सुरू आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी तटकरे यांना पाहून पाठ फिरवण्याच्या घटनेला महत्त्व आलं आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

दरम्यान, या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. दापोली अणूऊर्जा प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाल्याचं माझ्या वाचनात आलं. कोकणात रासायनिक प्रकल्प येऊ नयेत ही कोकणवासीयांची भूमिका आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे ही माझी माहिती आहे. मी दापोलीमध्ये जाणार आहे, त्यावेळी शेतकऱ्याची चर्चा करेल. त्यानंतर स्थानिकांची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडेल. अणुऊर्जा राष्ट्राची गरज आहे, हा एक भाग आहे. दापोलीला निसर्गाचे वरदान आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित रोजगार आहे. ब्रिटिश कालापासून दापोली थंड हवेचे ठिकाण आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत सरकारने याचा निर्णय घ्यावा ही माझी भूमिका असेल, असं तटकरे म्हणाले.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी