
देशात सर्वात महाग एक्स्प्रेस वे मुंबई-पुणे एक्स्प्रेस आहे. हा एक्स्प्रेस सर्वात जुना आहे. तसेच देशातील पहिलाच एक्स्प्रेस वे आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते पुणे असा हा एक्स्प्रेस वे सहा लेनचा आहे. तो सर्वात महाग एक्स्प्रेस आहे.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2002 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मंजूर केला होता. या एक्स्प्रेसवरुन प्रवास करताना वाहनधारकांना आपला खिसा चांगलाच रिकामा करावा लागतो. टोल जास्त लागत असला तरी या एक्स्प्रेस वेमुळे वेळ खूप वाचतो.

2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी या एक्सप्रेस वे ला सुरुवात केली होती. परंतु तो पूर्ण होण्यास 22 वर्ष लागली. या महामार्गावरील काही भागांत 2000 मध्ये वाहतूक सुरु केली होती.

महामार्गाची लांबी 94.5 किलोमीटर आहे. हा महामार्ग नवी मुंबईतील कलंबोली भागातून सुरु होतो. पुण्यातील किवळे येथे हा महामार्ग पूर्ण होतो. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉरपोरेशनने हा महामार्ग बनवला आहे. एक्स्प्रेस वे वर दोन्ही बाजूने 3-3 लेनचा आहे.

महामार्ग पूर्ण होण्यासाठी 16.3 हजार कोटी रुपये खर्च आला. त्यामुळे मुंबई-पुण्यातील अंतर दोन तासाने कमी झाले. एक्स्प्रेस वे वर 100 किलोमीटर प्रती तास या वेगाने वाहने जावू शकतात. या टोलवर कारसाठी 336 रुपये तर टोल लागतो. म्हणजे प्रति किलोमीटर 3.40 रुपये टोल लागतो.

देशातील इतर ठिकाणी सर्वात जास्त टोल 2.40 रुपये प्रती किलोमीटर लागतो. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसचा प्रवास किती महाग आहे, त्याची कल्पना येईल.