Gautami Patil : गौतमी पाटीलला पाहण्यासाठी गर्दी एवढी की… तरुण थेट झाडावर चढले
Gautami Patil : गौतमी पाटील आली म्हटल्यानंतर गर्दी तर होणारच.. गौतमीला पाहिल्यानंतर सर्वत्र एकच नारा असतो आणि को म्हणजे 'सबसे कातिल गौतली पाटील..', आता देखील गौतमी हिला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी जमली. अशात गौतमी दिसत नसल्याने अनेत तरुण तर थेट झाडावर चढले.. सध्या गौतमीच्या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गौतमी पाटील गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. तिच्या कर्यक्रमाला देखील असंख्य लोकांची गर्दी जमते. एवढंच नाही तर, तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
सांगायचं झालं तर, शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे नवीन आलिशान गाडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील, जानवी किल्लेकर आणि ओम यादव उपस्थित होते.
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला चाहत्यांची तुफान गर्दी झाली. ही पहिली वेळ नाही जेव्हा गौतमीच्या कार्यक्रमासाठी गर्दी झाली. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी चाहते गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं आहे .
गर्दीतून कार्यक्रम दिसत नसल्याने काही चाहत्यांनी थेट झाडावर चढत गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद घेतला. गौतमीच्या अदाकारीची क्रेझ अशी की… जागा कमी पडली, पण उत्साह मात्र कमी झाला नाही!
गौतमी पाटील हिने तिच्या डान्समुळे तर कायम चर्चेत असते. पण गौतमी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अनेक मुलाखतींमध्ये गौतमीने तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं, जो फार कठीण होता. आज गौतमी तिच्या आईसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.