हा पेनी शेअर लॉटरी लावणार! किंमत अवघी 2 रुपये, Adani समूहात एंट्री

Penny Share: अदानी समूहात एक कंपनी दाखल होत आहे. NCLT ने या व्यवहाराला मंजुरी दिल्याचे वृत्त आहे. अवघ्या दोन रुपये किंमत असलेल्या या शेअरकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. काय आहे मोठी अपडेट?

| Updated on: Feb 13, 2026 | 7:41 PM
1 / 6
देशाची दिग्गज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पुंज लॉयडच्या अधिग्रहणाविषयी मोठे वृ्त्त समोर येत आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) कंपनीच्या लिक्विडेशन दरम्यान गोईंग कन्सर्न म्हणून विक्रीला मंजूरी दिली आहे. सध्यस्थिती कंपनी जशी आहे तशीच ती घेण्यात येईल असे एनसीएलटीने म्हटले आहे.

2 / 6
जुनी थकबाकी, कायदेशीर वाद विवाद, कायदेशीर प्रक्रियेतंर्गत मिटवण्यात येतील . अदानी समूहाची कंपनी अदानी इन्फ्रास्ट्रक्चरने ई-ऑक्शनमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर अदानी इन्फ्रास्ट्रक्चरची बोली मंजूर झाली.

3 / 6
12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलसमोर सुनावणी झाली. त्यावेळी पुंज लॉयडचे अधिग्रहण अदानी इन्फ्रा लिमिटेड करेल असा आदेश देण्यात आला. हे संपूर्ण प्रकरण आयसीआयसीआयद्वारे दाखल दिवाळखोरीच्या याचिकेशी संबंधित आहे.

4 / 6
पूंज लॉयड ही शेअर बाजारात सूचीबद्ध कंपनी आहे.या कंपनीचा शेअर एका वेळी 600 रुपयांवर व्यापार करत होता. पण परिस्थितीत इतकी वाईट झाली की हा शेअर दोन रुपयांवर घसरला. आता या शेअरची ट्रेडिंग ठप्प झाली आहे.

5 / 6
पुंज लॉयडचा शेअर सध्या एनएसई आणि बीएसईवर निलंबित आहे. अडानी इन्फ्राला डीलिस्टिंगला मंजूरी मिळाली आहे. त्याचा अर्थ शेअरधारकांना भविष्यात लिक्विडेशन मूल्यांच्या आधारावर किंमत अदा करण्यात येईल. या कंपनीवर 6,000 कोटींचे कर्ज होते.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.