AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Cast : रणबीर कपूरच्या रामायण मध्ये किती मुस्लिम कलाकरांनी केलं काम? महत्वाच्या भूमिका कोणाच्या होत्या?

Ramayana Cast : अभिनेता रणबीर कपूर, यश आणि अभिनेत्री साई पल्लवी यांनी 'रामायण' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई करताना दिसत आहे. अशात 'रामायण' सिनेमा 5 मुस्लिम कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे... तर त्या कालाकारांबद्दल घ्या जाणून...

Ramayana Cast : रणबीर कपूरच्या रामायण मध्ये किती मुस्लिम कलाकरांनी केलं काम? महत्वाच्या भूमिका कोणाच्या होत्या?
| Updated on: Nov 17, 2026 | 11:00 AM
Share

Ramayana Cast : ‘रामायण’ सिनेमाचा विषय निघाला तर, समोर फक्त आणि फक्त अभिनेता रणबीर कपूर याचा चेहरा समोर येतो. रणबीर याच्यासोबतच यश, आदिनाथ कोठारे आणि साई पल्लवी यांनी देखील ‘रामायण’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने अनेक नवे विक्रम रचले आहे. ‘रामायण’ सिनेमा फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, 4000 कोटी रुपयांचा बजेट असलेल्या सिनेमात अनेक मुस्लिम कलाकारांनी देखील काम केलं आहे.

सिनेमाच्या कलाकारांवर नाही तर, क्रिएटिव टीमकडे नजर टाकल्यानंतर कळतं की, संगीतकार ए.आर. रेहमान यांच्यासोबतच अन्य 5 प्रमुख मुस्लीम सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अभिनय, संगीत आणि एडिटिंगच्या माध्यामातून सिनेमासाठी मोलाचं कार्य केलं आहे. सिनेमातील कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवि दुबे, सनी देओल, अरुण गोविल आणि अनुपम खेर यांनी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

सिनेमातील मुस्लीम कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर, या कथेतील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये तीन मुस्लिम कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रभावी छाप पाडली आहे. ‘पंचायत’ मालिकेतील फैसल मलिक याने रावणाचा भाऊ कुंभकर्ण याच्या भूमिकेत दमदार अभिनय केला आहे. छाया अली खान यांनी राणी सुनयना म्हणजे,नराजा जनक यांची पत्नी आणि सीतेची आई ही भूमिका साकारली आहे, तर अभिनेता जहांगीर खान याने लंकेच्या प्रमुख योद्ध्यांपैकी एक असलेल्या दूषण या राक्षसाची भूमिका निभावली आहे.

ए.आर. रहमान यांच्यासोबत मुलगा ए.आर. अमीनचाही आवाज

अभिनयाशिवाय सिनेमाच्या संगीत विभागातही दोन मोठ्या मुस्लिम कलाकारांचं योगदान आहे . ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी दिग्गज कंपोजर हान्स झिमर यांच्यासह एकत्र येऊन ‘रामायण’चं संगीत तयार केले आहे. सिनेमाच्या अल्बममधील समाविष्ट ‘हनुमान चालिसा’, ‘राइज ऑफ असुर’, ‘जुडी जुडी’ आणि ‘सीताज एस्पिरेशन’ यांसारखी प्रमुख गीते त्यांच्याच संगीत दिग्दर्शनाखाली बनली आहेत. ए.आर. रहमान यांचे पुत्र आणि गायक ए.आर. अमीन यानेही सिनेमाच्या साउंडट्रॅकसाठी आवाज दिला आहे. त्यांनी रक्षिता सुरेश, वैशाली सामंत आणि अंतरा नंदी यांच्यासोबत मिळून सीतेवर चित्रित केलेलं गाणं गायलं आहे.

तर पडद्यामागे काम करणाऱ्या मुख्य क्रिएटिव्ह आणि टेक्निकल टीममध्येही एका महत्त्वाच्या नावाचा समावेश आहे. सिनेमाच्या एडिटिंगची जबाबदारी हुजेफा लोखंडवाला यांनी सांभाळली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा सुरु आहे,

Follow Us
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा