AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दोन प्रवाशांचं कडाक्याचं भांडण, वादात निष्पाप प्रवासी…

धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार झाला आहे. दोन प्रवाशांचं कडाक्याचं भांडण झालं आहे. या वादात निष्पाप प्रवासी गंभीर जखमी झाला.

धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दोन प्रवाशांचं कडाक्याचं भांडण, वादात निष्पाप प्रवासी...
mumbai local clashImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 10:42 AM
Share

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण वाढत आहे. लोकलमधील वाढत्या गर्दीवरून प्रवाशांमध्येच हाणामारीच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी एका प्रवासाचा हामाणारीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  धावत्या लोकलमध्ये ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या किरकोळ वादात एका निष्पाप प्रवाशाच्या छातीत धारदार शस्त्र घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित प्रवाशाचे नाव सुरेश द्वारका शर्मा असं आहे. 52 वर्षीय सुरेश हा मूळचे झारखंडचे आहेत. ते सायन-धारावी परिसरात राहून सुतारकाम करतात. ते 15 नोव्हेंबर 2026 रोजी बोरीवली पूर्व भागात कामानिमित्त गेले होते.  त्यांचं काम संपलं, त्यानंतर ते दुपारी 11 वाजून 58 मिनिटांनी  बोरीवलीहून चर्चगेटला जाणारी अप फास्ट लोकल पकडली. सुरेश हे पहिल्या जनरल डब्यात दरवाज्याजवळ उभे होते. त्यावेळी मागच्या सीटवर बसलेले दोन प्रवासी एकमेकांशी वाद घालू लागले. अंधेरी स्टेशन आल्यावर दोघांचा वाद आणखी वाढला. ट्रेन अंधेरी स्टेशनला आल्यावर

त्याच वेळी त्यांच्या मागच्या सीटवर बसलेले दोन प्रवासी एकमेकांशी वाद घालू लागले. अंधेरी स्टेशन येण्यापूर्वी हा वाद वाढला. ट्रेन अंधेरीला थांबताच एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरला. तर दुसरा प्रवासी डब्यातच राहिला. ट्रेन अंधेरीहून पुढे निघाली. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या युवकाने त्याच्याकडील धारदार शस्त्र डब्याच्या आत फेकलं. ते शस्त्र दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला घुसलं. ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. हीच ट्रेन बांद्रा स्टेशनला पोहोचताच आरपीएफ आणि एमएसएफच्या जवानांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्यांना बांद्र्याच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. त्याचं नाव शिवाजी लक्ष्मण गायकवाड, वय २५ असं आहे. 25 वर्षीय आरोपी शिवाजी गायकवाड हा विना तिकीट प्रवास करत होता. हा गुन्हा अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय.

Follow Us
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...